Tuljabhavani Temple CCTV controversy : कैलास पाटलांनी मंत्री सरनाईकांच्या 'त्या' दाव्यातील हवाच काढली; म्हणाले, 'टिंगल-टवाळी....'

Operation Tiger remark News : धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूरमधील तुळजाभवानी मंदिरात बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गंभीर प्रश्न उपस्थित केला होता.
pratap saranaik, kailas patil
pratap saranaik, kailas patil Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या मुद्द्यावरून सध्या सत्ताधारी व विरोधकाकडून टीका टिपण्णी सुरु आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूरमध्ये बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षेचा आणि परवानगीचा गंभीर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावरून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील’ असे वक्तव्य पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. मात्र आता, आमदार पाटील यांनी या वक्तव्यावर जोरदार पलटवार करीत मंत्री सरनाईकांना घेरले आहे.

धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूरमधील तुळजाभवानी मंदिरात बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षेचा आणि परवानगीचा गंभीर प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बोलताना मंत्री सरनाईक यांनी ‘कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग असतील’ असे वक्तव्य केले. त्यावर तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेसारख्या संवेदनशील विषयावर टिंगल-टवाळी करणे योग्य नसल्याचे सांगत कैलास पाटील यांनी पालकमंत्र्यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे.

तुळजापूरमध्ये बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यांच्या मुद्द्यावरून यापूर्वी कैलास पाटील यांनी गंभीर आरोप केले होते. केंद्र सरकारची परवानगी नसलेल्या चिनी कंपनीचे CCTV कॅमेरे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने बसवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. या आरोपांवरून दोन्ही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण रंगले होते. त्यावर उत्तर देताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केलेले विधान चर्चेत आले आहे.

pratap saranaik, kailas patil
Maharashtra Politics Live Update : सिद्धीविनायक मंदिरातील दानचोरी प्रकरण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असलेल्या सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधताना तुळजापूरमध्ये बसवलेल्या CCTVच्या माध्यमातून कैलास पाटील कुठे जातात, घरी कधी जातात आणि तुळजापूरला कधी येतात याची माहिती ठेवली जात असल्याचा मिश्किल टोला सरनाईक यांनी लगावला होता. या माहितीच्या आधारे ‘ऑपरेशन टायगर’ यशस्वी करू, असे मत सरनाईक यांनी व्यक्त केले होते.

pratap saranaik, kailas patil
Maharashtra Political Live Update : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्याविरोधात तब्बल पाच कोटी रुपयांचा मानहानीचा दावा

या वक्तव्यामुळे कैलास पाटील चांगलेच भडकले असून त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला. तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेचा आणि CCTV व्यवस्थेचा विषय हा केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा विषय नसून सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असल्याचे सांगत त्यांनी नाराजी व्यक्त केली. एवढंच नव्हे तर CCTV प्रकरणातील मूळ मुद्द्यावर उत्तर देण्याऐवजी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा करून विषयाला वेगळे वळण दिले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

त्यासोबतच यावेळी CCTVच्या माध्यमातून पाळत ठेवली जात असल्याच्या सरनाईक यांच्या वक्तव्यावरही कैलास पाटील यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली आहे. ‘माझ्यावर पाळत ठेवायची असेल तर 24 तास कॅमेरे असलेली गाडी माझ्या मागे लावा,’ असे आव्हान पाटील यांनी दिले आहे.

pratap saranaik, kailas patil
Maharashtra Live Update: शिक्षिकेची बदली रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांनी घातलं थेट आमदारांनाच साकडं

तुळजाभवानी मंदिराच्या सुरक्षेचा आणि CCTV व्यवस्थेचा विषय हा केवळ राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा विषय नसून सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आहे. ‘CCTVच्या बाबतीत चायनीज-जपानीज असे बोलणे पालकमंत्र्यांकडून अपेक्षित नव्हते. एवढंच नव्हे तर CCTV प्रकरणातील मूळ मुद्द्यावर उत्तर देण्याऐवजी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चा करून विषयाला वेगळे वळण दिले जात असल्याचा आरोपही कैलास पाटील यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com