Ranajagjeet Singh Patil News : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला पक्षप्रवेशाच्या आरोपानंतर राणा पाटलांकडून स्पष्टीकरण! सुप्रिया सुळेंना पत्र

Tuljapur Nagar Parishad Election 2025 : आपण स्वतः एवढ्या जबाबदार व्यक्ती असतानाही आपल्याकडून जे काही बोललं गेलं, ते तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र तुळजापूरची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या षडयंत्राला नकळत का असेना बळ देणारं आहे.
MLA Rana Jagjeetsingh Patil Write Letter To MP Supriya Sule News
MLA Rana Jagjeetsingh Patil Write Letter To MP Supriya Sule NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या भाजप प्रवेशावरून आमदार राणा पाटील यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

  2. या संदर्भात त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना सविस्तर पत्र लिहून स्पष्टीकरण दिले आहे.

  3. या प्रकरणामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून आरोप–प्रत्यारोपांची नवी मालिका सुरू झाली आहे.

Dharashiv Political News : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात आरोप आणि गुन्हा दाखल असलेल्या विनोद गांगणे याला नुकताच भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. केवळ प्रवेशच नाही तर तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाची उमेदवारीही दिली गेली. यावरून भाजपचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील व राज्याच्या नेतृत्वावर टीकेची झोड उठवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना सविस्तर पत्र लिहित विनोद गांगणे हा संशयित आरोप आहे. त्याच्यावर अजून गुन्हा सिद्ध झालेला नाही. मुळात त्याने ड्रग्ज रॅकेट उद्वस्त करण्यात पोलीसांची मदत केली होती. परंतु पोलीसांनी त्यालाच आरोपी केल्याचा दावा केला आहे. या विषयात सविस्तर माहिती हवी असेल तर मी ती देण्यास तयार असल्याचे पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.

तुळजापूरमध्ये भाजपने थेट ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला पक्षप्रवेश आणि नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर केल्यानंतर धाराशीव जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही यावरून भाजपच्या नेत्यांना सवाल केला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रवेशाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय हे अत्यंत चिंताजनक आहे. अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन देणाऱ्यांना राजकीय पक्षात स्थान देणे म्हणजे समाजविघातक कृत्यांना थारा देणे आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले होते.

MLA Rana Jagjeetsingh Patil Write Letter To MP Supriya Sule News
Tuljapur Drugs Racket: उद्धव ठाकरेंच्या खासदारांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र; तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी मोठी मागणी

या पत्रावर आता उत्तर देतांना राणा पाटील यांनी नात्या-गोत्याचा उल्लेख करत स्पष्टीकरण दिले आहे.

प्रति मा.खा. सुप्रियाताई,आदरणीय अजितदादा पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक आहेत, त्याप्रमाणेच आपण सुद्धा माझ्या जवळच्या नातेवाईक आणि माझ्या थोरल्या बहीण आहात आणि त्याचा मला मनापासून आदर आणि अभिमान आहे. मात्र, काही चुकीच्या आणि अपुऱ्या माहितीद्वारे किंवा कदाचित राजकीय अपरिहार्यतेतून आपण व्यक्तिशः माझ्याबद्दल जाहिरपणे सलग वक्तव्ये करीत आहात.

MLA Rana Jagjeetsingh Patil Write Letter To MP Supriya Sule News
Marathwada Political News : धाराशिव रेल्वे पुनर्विकास कार्यक्रमातून मंत्री सावंत यांना कुणी डावलले ?

तुळजापूर येथील माजी नगराध्यक्ष श्री. संतोष परमेश्वर यांनी माझ्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. हा प्रवेश करायच्या क्षणापर्यंत ते तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तुळजापूर शहरातील प्रमुख नेते होते, हे कदाचित आपल्याला माहीत नसेल. त्यांच्यावर ड्रग्जप्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काही काढून टाकण्यात आले नव्हते. ते ही योग्यच होते, कारण वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बहाल केलेल्या संविधानातील तरतुदीनुसार, जोवर एखादा दोष सिद्ध होत नाही, तोवर त्या व्यक्तीला निरपराधच मानले जाते.

त्यामुळेच तर आपल्या सहकारी असलेल्या राज्यातील मंत्र्यांवर अत्यंत गंभीर आरोप असतानादेखील आपण त्यांना मंत्रिमंडळात कायम ठेवले होते. आपण स्वतः एवढ्या जबाबदार व्यक्ती असतानाही आपल्याकडून जे काही बोललं गेलं, ते तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र तुळजापूरची जाणीवपूर्वक बदनामी करण्याच्या षडयंत्राला नकळत का असेना बळ देणारं आहे. तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणाबाबत आपण सलग दोन वेळा जे वक्तव्य केले आहेत, त्याची वस्तुनिष्ठ माहिती आपण जाणून घ्यायला हवी होती. नाहीतर ही वक्तव्ये राजकारणाने प्रेरित 'मीडिया ट्रायल' करण्यासाठी जाणीवपूर्वक केली जात असल्याचं स्पष्ट होतंय.

विधानसभा निवडणुकीच्या काळात तुळजापूर शहरातील स्थानिक माता-भगिनींनी शहरात सुरू असलेल्या या गंभीर प्रकाराची माहिती मला दिली. त्याचवेळी हे सगळं उध्वस्त करून टाकण्याचा शब्द मी त्यांना दिला होता. त्यानुसार मी खोलात जाऊन याबाबत माहिती मिळविली. तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक यांना मी स्वतः iMesssage करून याबाबतची माहिती पुरवली व पाठपुरावा केला. तसेच, याबाबत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती देण्यासाठी श्री. विनोद गांगणे यांना जोडून दिले.

या व्यक्तीने हे सगळे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी पोलिसांना सहकार्य केले (संबंधित पोलीस अधिकाऱ्याचा जबाब जोडला आहे). दुर्दैवाने पोलिसांनी सहकार्य करणाऱ्यांनाच यात आरोपी बनविले. न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर करताना या बाबी आवर्जून नमूद केल्या आहेत. कोण खरे गुन्हेगार आहेत? हे अंतिमतः न्यायालय ठरवेलच, असेही राणा पाटील यांनी पत्रात नमूद केले.

शताब्दी रुग्णालयावरही स्पष्टीकरण

सौ. अंजलीताई दमानिया यांनी उपस्थित केलेल्या मुंबईतील शताब्दी रुग्णालयाच्या निविदा प्रक्रियेत तेरणा ट्रस्टने केवळ सहभाग घेतला आहे. यापूर्वी दोन ते तीन वेळा निविदा मागविण्यात आल्या होत्या. मात्र कोणीही सहभागी झाले नाही. तिसऱ्यांदा निविदा निघाल्यानंतर तेरणा ट्रस्टने त्यात सहभाग घेतला. यात नेमकं चुकीचं काय झाले आहे? जरा आपण सांगू शकलात, तर बरं होईल ! म्हणजे आपलं नेमकं म्हणणं काय हे कळेल. आपल्या अजूनही काही शंका असतील, तर त्या दूर करण्याची माझी प्रामाणिक इच्छा आहे. आपल्यासोबत चर्चा करून सगळी वस्तुनिष्ठ माहिती पुराव्यांसह दाखविण्याची माझी तयारी असल्याचे राणा पाटील यांनी पत्राच्या शेवटी म्हटले आहे.

काय आहे ड्रग्ज प्रकरण?

तुळजापूर तालुक्यातील तालमवाडी येथे फेब्रुवारी महिन्यात कारवाई करताना पोलिसांनी एकूण 2.5 लाख रुपये किमतीच्या 59 एमडी ड्रग्जच्या पुड्या जप्त केल्या होत्या. या ड्रग्ज तस्करी प्रकरणात जवळपास 25 आरोपींची नावे समोर आली होती. त्यातील काही आरोपींना अटक करण्यात आली होती, तर काही आरोपी फरार आहेत. तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरण समोर आल्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपही झाले होते. तसेच तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किर्ती पुजा यांनी तुळजाभवानी मंदिरातील आरोपी पुजाऱ्यांची यादी पोलिसांनाकडून मागवली होती.

FAQs

1️⃣ तुळजापूर ड्रग्ज प्रकरण नेमकं काय आहे?

तुळजापूरमध्ये उघडकीस आलेल्या ड्रग्ज व्यवहारातील आरोपींच्या नेटवर्कशी संबंधित प्रकरण आहे.

2️⃣ आरोपींच्या भाजप प्रवेशावर वाद का निर्माण झाला?

गंभीर प्रकरणातील आरोपींना पक्षात प्रवेश देण्यात आल्याने नैतिकता आणि राजकीय जबाबदारीवर प्रश्न उपस्थित झाले.

3️⃣ राणा पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना पत्र का लिहिले?

या प्रवेशाबाबत स्पष्टीकरण व राजकीय भूमिका स्पष्ट करण्यासाठी त्यांनी सुळे यांना सविस्तर पत्र पाठवले.

4️⃣ या प्रकरणावर BJP ची भूमिका काय आहे?

BJP कडून अद्याप अधिकृत स्पष्टीकरण आलेले नाही किंवा परिस्थितीनुसार विविध प्रतिक्रिया येऊ शकतात.

5️⃣ या वादाचा आगामी राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो?

स्थानिक ते राज्य पातळीवर राजकीय वातावरण तापण्याची आणि पक्षांमध्ये आरोप–प्रत्यारोप सुरू राहण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com