Tuljapur Drugs Racket: उद्धव ठाकरेंच्या खासदारांचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र; तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी मोठी मागणी

Omraje Nimbalkar letter to CM : तुळजापूरमधील ड्रग्जचा सुळसुळाट ज्या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात झाला, त्याच डीवायएसपी निलेश देशमुख यांना बदली न करता एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली, याबद्दल राजेनिंबाळकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
OmRaje Nimbalkar | Uddhav Thackeray
OmRaje Nimbalkar | Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : तुळजापूर शहरातील गाजत असलेल्या ड्रग्ज रॅकेट प्रकरणात पोलिसांची कारवाई केवळ दिखाऊ असून मुख्य सूत्रधार अजूनही मोकाट आहेत, असा आरोप करत धाराशिवचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी वादग्रस्त पोलीस उपअधीक्षक निलेश देशमुख यांना दिलेल्या मुदतवाढीवर तीव्र आक्षेप घेत, तातडीने बदलीची मागणी केली आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी केले आहे. त्यांनी मुख्यमंत्र्यांना 9 सप्टेंबर रोजी पाठवलेल्या निवेदनात तुळजापूरमधील ड्रग्ज रॅकेटबाबत धक्कादायक खुलासे केले आहे. तुळजापूरमधील ड्रग्ज रॅकेटमधील अनेक आरोपींना जामीन मिळाल्यानंतरही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे, या आरोपींपैकी एका व्यक्तीचा राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर सत्कार केल्याचेही त्यांनी उघड केले आहे.

तुळजापूरमधील ड्रग्जचा (Tuljapur Drugs Racket) सुळसुळाट ज्या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात झाला, त्याच डीवायएसपी निलेश देशमुख यांना बदली न करता एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली, याबद्दल राजेनिंबाळकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. "ज्याच्या कार्यक्षमतेवर गंभीर शंका आहे, अशा अधिकाऱ्यालाच बक्षीस दिले जात आहे. ही बाब सरकारच्या नियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते," असे मत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.

राजेनिंबाळकर पुढे म्हणाले, "या अधिकाऱ्याकडेच तपास ठेवणे म्हणजे लांडग्याच्या हाती कोकराचे रक्षण देण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळातील कारभारावर विश्वास ठेवता येत नाही."

OmRaje Nimbalkar | Uddhav Thackeray
Madha Kala kendra Clash: यवत, धाराशिवनंतर आता माढा..! कलाकेंद्रात बारी लावण्यावरून तुफान राडा; तरुणावर झाडली गोळी

मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या चार प्रमुख मागण्या :

ड्रग्ज रॅकेटमधील सर्व मुख्य आरोपींना तातडीने अटक करून मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करावी. आरोपीचा सत्कार करणाऱ्या मंत्र्यांविरोधात नैतिक जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात यावी. डीवायएसपी निलेश देशमुख यांना दिलेली मुदतवाढ तातडीने रद्द करून त्यांची बदली करावी. संपूर्ण प्रकरणाचा तपास स्वतंत्र आणि उच्चस्तरीय यंत्रणेकडे सोपवावा.

राजकीय भेद विसरून या गंभीर प्रकरणात कठोर आणि निःपक्ष कारवाई करण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. या पत्रामुळे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाचा राजकीय आणि प्रशासकीय गुंता आणखी वाढला असल्याचंही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com