Chhagan Bhujbal News : 'शिरूरच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांचा फोन...', अमोल कोल्हेंच्या दाव्यावर छगन भुजबळांचे प्रत्युत्तर

Loksabha Election 2024 : नाशिकवरील दावा राष्ट्रवादीने (अजित पवार गट) सोडला नसल्याचे सांगण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी येथून माघार घेतली असली तरी त्यांच्या परिवारातील दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे.
Amol Kolhe| Chhagan Bhujbal
Amol Kolhe | Chhagan Bhujbal Sarkarnama
Published on
Updated on

Loksabha Election 2024 : शिरूरचे शरद पवार गटाचे उमेदवार डाॅ. अमोल कोल्हे यांनी अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील यांना पक्षाचा उमेदवारी देण्याचा विचार नव्हता. खुद्द मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छगन भुजबळ यांना शिरूरमधून लढता का? अशी विचारणा केली होती. मात्र, अमोल कोल्ह्यांच्या दाव्यात किती तथ्य आहे, याची विचारणा केली जात होती. कोल्हेंच्या दाव्यानंतर छगन भुजबळ यांनीदेखील याविषयी स्पष्टपणे आपली भूमिका मांडली आहे.

Amol Kolhe| Chhagan Bhujbal
Lok Sabha Election 2024 : मुख्यमंत्री भुजबळांना देणार होते शिरूरमधून उमेदवारी, पण..! कोल्हेंनी आढळरावांना डिवचलं

छगन भुजबळ Chhagan Bhujbal म्हणाले, माझी उमेदवारी नाशिकमधून पक्की झाली होती. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी मला फोन केला. त्यांनी तुम्ही शिरूर लोकसभा लढवता का? तेथेदेखील ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, मी नाशिक सोडून जायचा प्रश्नच नव्हता. मी शिरूरमधून लढलो असतो, तर नाशिकची जागा त्यांना मिळाली असती हा त्याच्या मागचा हेतू होता.

नाशिकवरील दावा राष्ट्रवादीने (अजित पवार गट) अजूनही दावा सोडला नसल्याचे सांगण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी येथून माघार घेतली असली तरी त्यांच्या परिवारातील दुसऱ्या व्यक्तीला उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. तर शिवसेनेकडून (शिंदे गट) खासदार हेमंत गोडसे यांचेच नाव उमेदवार म्हणून आघाडीवर आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंकजा मुंडेंना सल्ला

पंकजा मुंडे यांनी प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांना नाशिकमधून उमेदवारी देण्याच्या संदर्भात वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावून पंकजा यांनी त्यांच्या निवडणुकीत लक्ष द्यावे. त्यांनी निवडून येणे महत्त्वाचे आहे. आमच्याकडे उमेदवार नाहीत असे नाही, आमच्याकडे खूप उमेदवार आहेत, असे छगन भुजबळ म्हणाले.

राष्ट्रवादीची बैठक

नाशिकच्या उमेदवारीबाबत अद्याप महायुतीमधील तिढा कायम आहे. शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीकडूनही या जागेवर दावा केला जात आहे. यासंदर्भात आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक राष्ट्रवादी भवनमध्ये येथे झाली. या बैठकीत नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटावी, असा ठराव एकमताने करण्यात आला.

R

Amol Kolhe| Chhagan Bhujbal
Loksabha Election 2024 : जम्मूत 370 हटविल्यानंतरचा लोकसभेचा कौल कुणाच्या बाजूने..?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com