Asaduddin Owaisi
Asaduddin OwaisiSarkarnama

'पाच मिनिट देशातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद करा, ओवेसीला पाकिस्तान सिमेवर सोडतो'

रात्री दहा वाजेनंतर मशिदिचे भोंगे वाजले तर त्यांना करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडून फेकून द्यावे, असे करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपाल सिंह अम्मू यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद : रात्री दहा वाजेनंतर मशिदिचे भोंगे वाजले तर त्यांना करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडून फेकून द्यावे, असे आवाहन करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सूरजपाल सिंह अम्मू यांनी केले. उच्च न्यायालय (High Court) ही संवैधानिक संस्था असून निर्णय सर्वांसाठी बंधनकारक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या संविधानानुसार देश चालतो, उच्च न्यायालयही त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Asaduddin Owaisi
AAP च्या पिंपरी पदाधिकाऱ्यावर भरदिवसा खूनी हल्ला, हल्लखोरांत दोन अल्पवयीन...

एमजीएम विद्यापीठाच्या रूक्मिणी सभागृहात रविवारी (ता.10 एप्रिल) करणी सेनेचे महासम्मेलन झाले. यावेळी करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष देविचंदसिह बारवाल, माजी खासदार उत्तमसिंह पवार, अंबादास दानवे, शिवचैतन्य महाराज, उदयसिंग राजपूत, करणी सेनेच्या महिला विंगच्या राष्ट्रीय अध्यक्ष राखी गर्ग, प्रदेश महिला विंगच्या अॅड. संध्या राजपूत, बादल सिंग तवर, अमिता शेखावत, पंकजसिंह ठाकूर, बाबा ठाकूर, बाबा परदेशी, मधुकर ढोमसे, सुभाष राठौर, दिनेश राजपूत आदींची उपस्थिती होती. यावेळी राजपाल सिंह अम्मू यांनी पोलिस हटवा म्हणणाऱ्या खासदार ओवेसींचा समाचार घेतला. पाच मिनिट देशातील सीसीटीव्ही यंत्रणा बंद करा, ओवेसीला पाकिस्तान सिमेवर सोडतो असे उद्गार त्यांनी काढले.

Asaduddin Owaisi
काहींनी 'हिंदुहृदयसम्राट' बनवण्याचा प्रयत्न केला पण लोकांनी झिडकारला : ठाकरेंचा टोला

उच्च न्यायालय हे संवैधानिक संस्था असून निर्णय सर्वांसाठी बंधनकारक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार देश चालतो, उच्च न्यायालय त्याचाच एक भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हम दो हमारे दो हाच न्याय सर्वांसाठी असावा, असा ठरावही महासंमेलनात घेण्यात आला. लवकरच लोकसंख्या नियंत्रण कायदा आमला जावा यासाठी करणी सेना केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या महासंमेलनाचे अॅड. आनंदसिंह बायस यांनी सूत्रसंचालन तर प्रास्तविक देविचंदसिंह बारवाल यांनी केले. संमेलनात महाराणा प्रताप व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर गीत सादर करणारे गायक अमरसिंह रघुवंशी व गायिका संध्या मिश्रा यांचा सत्कार करण्यात आला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com