Sillod Assembly Constituency : अब्दुल सत्तारांच्या विरोधात भाजप लागली कामाला, मतदारांची दुबार नावे रद्द करण्याची मागणी..

Twenty Seven Thousand double voter registration in Abdul Sattar's constituency : त्यानूसार दुबार नावे सामाविष्ट असणे ही अत्यंत गंभीर स्वरुपाची बाब आहे. दुबार नावे ही आपल्या मतदारसंघातील कोणत्या यादी भागातील आहे, याची तपासणी करून सदरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडुन प्रत्यक्ष पडताळणी करून घ्यावीत.
Abdul Sattar
Abdul Sattar Sarkarnama
Published on
Updated on

Sillod BJP Political News : राज्याचे अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री तथा संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघात तब्बल 27 हजार नावांची दुबार नोंदणी झाल्याचा आक्षेप भाजपने घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपुर्वी ही दुबार नावे रद्द करा, अशी मागणी भाजपने जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत केली आहे.

भाजपच्या या मागणीमुळे तालुक्यातील वातावरण तापले असून भाजप अब्दुल सत्तारांच्या (Abdul Sattar) विरोधात कामाला लागल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे. सिल्लोड- सोयगाव विधानसभा मतदारसंघातील 27 हजार नावे 2024 विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीत आढळली आहेत. एकाच व्यक्तिची दोन-तीन ठिकाणी नावे आल्याचे सिद्ध झाले आहे.

त्यातील त्याच नावाचे व्यक्ती दोन ठिकाणी सारखे असु शकतात, असे गृहित धरले तरी बहुतेक ठिकाणी हेतूपुरस्पर दोन ठिकाणी नावे मतदार यादीत सामाविष्ट करण्यात आली आहेत, असा दावा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मतदार यादीच्या पुराव्यासह जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची भेट घेऊन छत्रपती संभाजीनग येथे तक्रार देऊन आक्षेप नोंदवण्यात आले आहेत.

Abdul Sattar
Abdul Sattar : "...याचे शिल्पकार तर मुख्यमंत्री शिंदे," तू-तू-मैं-मैं करत सत्तार अन् दानवे 'रेल्वेट्रॅक'वर

जिल्हाधिकारी यांनी 20 आॅगस्ट 2024 रोजी मतदान नोंदणी अधिकारी सिल्लोड तथा उपविभागीय अधिकारी सिल्लोड यांना आदेशित केलेले आहे. (BJP) त्यानूसार दुबार नावे सामाविष्ट असणे ही अत्यंत गंभीर स्वरुपाची बाब आहे. दुबार नावे ही आपल्या मतदारसंघातील कोणत्या यादी भागातील आहे, याची तपासणी करून सदरील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडुन प्रत्यक्ष पडताळणी करून घ्यावीत.

खरच दुबार नावे आहे किंवा नाही याची खात्री करावी व सदरील कामात कोणत्याही कर्मचाऱ्यांनी काही चुका केलेल्या असल्यास त्यांच्याविरुद्ध आपल्या स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. यानंतर अशी पुनरावृत्ती होणार नाही याची दक्षता घ्यावी, कारवाई करुन केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयात सादर करावा, असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहे.

Abdul Sattar
BJP Politics 'या' राज्यात नापास मंत्र्यांना घरी पाठवणार? जे पी नड्डा प्रगती पुस्तक तपासणार

सदरील नावे वगळण्याबाबत भाजपाचे प्रदेश चिटणीस, सिल्लोड सोयगाव विधानसभा निवडणुक प्रमुख सुरेश बनकर, भाजपा अल्पसंख्याक प्रदेशाध्यक्ष इद्रिस मुलतानी, माजी आमदार सांडु पा. लोखंडे, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मोठे, तालुकाध्यक्ष अशोक दादा गरूड, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल मिरकर ,तालुकाध्यक्ष बद्री राठोड यांनी पुराव्यासह आक्षेप दाखल करून बोगस नावे वगळण्याची मागणी केली होती.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे कल्याण काळे यांना मताधिक्य मिळाले होते. महायुती असूनही अब्दुल सत्तार यांनी उघडपणे काळे यांना मदत केल्याची कबुली दिली होती. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत अब्दुल सत्तार यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याची रणनिती भाजपने आखल्याची चर्चा आहे. मतदारसंघातील 27 हजार दुबार मतदार नोंदणीवरील आक्षेप हा त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जाते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com