Mahavitaran Officers Bribery News : महावितरणच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कामाच्या मंजुरीसाठी लाच घेताना रंगेहाथ पकडले!

Mahavitaran Officer arrested for Bribery : याप्रकरण दोन्ही अधिकाऱ्यांना लाचेच्या रक्कमेसह पोलिसांनी ताब्यात घेतले असून, कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
accepting bribe
accepting bribeSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar MSEB Bribery News : राज्य सरकारने नुकताच महावितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पगारात घसघशीत वाढ केली. हा निर्णय होऊन तीन दिवस उलटत नाही तोच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महावितरणचे दोन वरिष्ठ अधिकारी लाचखोरीच्या प्रकरणात सापडले. एका कामाच्या मंजुरीसाठी त्यांनी संबंधितांकडे साडेतीन लाखाची लाच मागितली होती.

त्यापैकी एक लाख स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कार्यकारी अभियंता धनाजी रामगुडे आणि उपव्यवस्थापक प्रवीण दिवेकर असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे आहेत.

accepting bribe
Ambadas Danve : 'कश्मीर देश का अटूट अंग है', म्हणता पण आतंकवाद जम्मूपर्यंत पोहोचला; ठाकरे गटाची तोफ धडाडली

कन्नड महावितरण कार्यालयात हा प्रकार घडला. लाच घेणारे दोन्ही अधिकारी हे क्लास वन, क्लास टू च्या दर्जाचे आहेत. धनाजी रघुनाथ रामुगडे कार्यकारी अभियंता आहेत. तर प्रवीण दिवेकर हे उपव्यवस्थापक आहेत. आज महावितरण कंपनीच्या कन्नड कार्यालयात लाच घेताना या दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.

तक्रारदाराकडे या अधिकाऱ्यांनी साडेतीन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. यापूर्वी तक्रारदाराकडून त्यांनी दीड लाख रुपयांची लाच घेतली होती. उर्वरित दोन लाखांपैकी तडजोड करून एक लाख रुपये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले.

accepting bribe
Amit Deshmukh News : 'नितीन गडकरींच्या कामाबद्दल शंका नाही पण...', अमित देशमुख विधिमंडळात गरजले

आरोपी रामगुडे व दिवेकर यांना कार्यालयातच लाच घेताना छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या दोन्ही आरोपींना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले आहे. लाच घेणाऱ्या महावितरणच्या दोन्ही अधिकाऱ्यांवर कन्नड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com