Uddhav Thackeray News : ''आता फडणवीसांच्या याच 'पीए'ला पाडा''; उद्धव ठाकरेंचं जाहीर सभेत विधान!

Shivsena (UBT) Latur News : जाणून घ्या, नेमकं कोणाबद्दल आणि कुठं असं म्हणाले आहेत उद्धव ठाकरे?
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

जलील पठाण

Latur Political News : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानिमित्त लातूर, धाराशिव दौऱ्यावर आलेल्या शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीचीही तयारी सुरू केली आहे. औसा मतदारसंघातील सभेत बोलताना उद्धव ठाकरे, संजय राऊत, अंबादास दानवे या सगळ्याच नेत्यांनी भाजपचे विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांना टीकेचे लक्ष्य केलेे. फडणवीसांचा पीए असा उल्लेख करत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पाडा, असे आवाहनच या सगळ्या नेत्यांनी केले.

'औशाची जागा शिवसेनेकडे असताना व तेथे दिनकर माने यांनी दोन वेळा विजय मिळवला असताना केवळ देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीवरून ही हक्काची जागा देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या पीएसाठी सोडली. माझ्या सरळ स्वभावाची परतफेड माझ्या पाठीत खंजीर खुपसून करतील याची कल्पना नव्हती. मात्र, आता यांचे खरे स्वरूप उघड झाले आहे. आता याच फडणवीसांच्या पीएला पाडा, असे आवाहन उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी या वेळी केले. शिवसेना नेते संजय राऊत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ठाकरेंप्रमाणेच अभिमन्यू पवार यांना लक्ष्य केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray
Nanded BJP News: नांदेडमध्ये शत-प्रतिशत भाजप की अशोक चव्हाण ?

'जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने औशात आलेल्या या नेत्यांचा सगळा रोख अभिमन्यू पवार(Abhimanyu Pawar) यांच्यावरच असल्याचे दिसून आले. देवेंद्र फडणवीस माझ्याकडे गयावया करीत आले आणि त्यांचा पीए अभिमन्यू पवार यांच्यासाठी औशाची जागा सोडली. मात्र त्यांनी पाठीत खंजीर खुपसला आहे. जिंकणारी जागा मी प्रेमाने सोडली होती, पण आता ती पाडा. केवळ लोकसभाच नव्हे तर विधानसभेतही औशाच्या जागेवर आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आला पाहिजे,' अशी गर्जना ठाकरे यांनी केली.

याशिवाय 'रस्त्याचे जनक म्हणून अभिमन्यू पवार आपली पाठ थोपटून घेत आहेत. मात्र, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मातोश्री पाणंद रस्ते योजना आणली आणि हे याचे जनक बनू पाहत आहेत. हे म्हणजे असं झालं "कोणालाही पोरगं झालं तरी आपलंच म्हणणे" असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला. औसा मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत, रुग्णालयाचा प्रश्न आहे, गुत्तेदारी वाढली आहे, तर अप्रोच रोड, चौकात उड्डाणपूल होणे आवश्यक असल्याचे सांगत मग या आमदारांनी केले काय? असा सवालही दानवे यांनी केला.

Uddhav Thackeray
Hingoli Loksabha News : अमित शाह शब्द फिरवणार? शिवसेना खासदार हेमंत पाटलांची उमेदवारी धोक्यात?

फडणवीस(Devendra Fadnavis) हे चोरांचे सरदार आहेत. या सरदाराला आता तुरुंगात टाकायचे आहे. त्यांचा पीए असलेला आमदार अभिमन्यू हासुद्धा त्या चोरांच्या सरदाराचा एक सदस्य आहे. मोदी वगैरे सब झूट आहे. विश्वासघाताचं दुसरं नाव म्हणजे मोदी आहे. गॅरंटी फक्त उद्धव ठाकरेंची आहे. फडणवीसांच्या पीएनी औशासाठी काय केलं आहे, याचा त्यांनी हिशेब द्यावा, असे आव्हान देतानाच औशात आता शिवसेनेचा भगवा फडकवा,असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या भाषणातून केले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com