Shivsena News : बीडमध्ये ठाकरे गट आक्रमक; शिवसैनिकांनी मुंडन करुन केला निकालाचा निषेध

Political News : नार्वेकर यांनी दिलेला निकाल महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासीक काळा दिवस असल्याचा आरोप करण्यात आला.
Beed shivsena
Beed shivsena Sarkarnama
Published on
Updated on

Beed News : शिवसेनेतील फुटीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल दिला. त्यांनी दिलेला निर्णय ठाकरे गटाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात सर्वत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचा निषेध करण्यात येत आहे.

बंडखोरी करणाऱ्या आमदारांबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी दिलेला निकाल महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासीक काळा दिवस असल्याचा आरोप शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी केला. याच्या निषेधार्थ पदाधिकाऱ्यांनी नार्वेकर यांच्या प्रतिमांना जोडे मारुन मुंडन करत या निकालाचा निषेध केला.

Beed shivsena
Tatkare and Gogawale : सुनील तटकरे आणि भरत गोगावलेंमधील वितुष्ट संपले!

सत्ता पिपासू भाजप (Bjp) सरकार रामाचा कुठलाच आदर्श पाळत नाही. रामाने १४ वर्षे वनवास भोगला मात्र भाजप १४ दिवस देखील सत्तेशिवाय राहू शकत नाही, असे म्हणत राहूल नार्वेकर यांच्या प्रतिमांना जोडे मारण्यात आले. हा निकाल लोकशाहीला काळीमा फासणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमीत शहा यांनी आगामी निवडणुकीच्या भितीने शिवसेना संपविण्याचे षडयंत्र रचले असून त्याचाच परिणाम हा निकाल असल्याचे म्हटले आहे. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश वरेकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मुंडन करुन निषेध केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावेळी संजय महाद्वार, नितीन धांडे, हनुमंत जगताप, राजू महुवाले, सुशील पिंगळे, गोरख सिंगन, शेख निजाम, गजानन कदम, रवी वाघमारे, सय्यद नायुम, जगदीश वखरे, धनराज साळुंके, सचिन उधाण, ओमकार राऊत, रमेश नवले, धम्मदीप वडमारे, अमित जोगदंड, नितीन मोरे, सचिन चंदनशिव, भूषण दहिवळे, प्रदीप वाघमारे, संतोष दराडे, मुकेश गाडे, तुकाराम हांडे उपस्थित होते.

(Edited by Sachin Waghmare)

Beed shivsena
Rahul Narvekar Final Decision : 20 जून 2022 ते 10 जानेवारी 2024; जाणून घ्या अपात्रता प्रकरणाचा प्रवास

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com