उद्धव ठाकरे उद्या मराठवाडा दौऱ्यावर जाणार असून एका दिवसात पाच जिल्ह्यांची पाहणी करतील.
या दौऱ्यात ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेणार आहेत.
मराठवाड्यातील पिकांच्या नुकसानीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे.
Heavy Rainfall News : मराठवाड्यात अतिवृष्टी, पूराने हाहाकार उडाला आहे. घरं, पीकं, जनावरे, शेती वाहून गेली. अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्हीकडच्या नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. आज आणि उद्या मराठवाड्यात प्रमुख पक्षांचे नेते नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा उद्या (ता.25) रोजी लातूर पासून पाहणी दौरा सुरू होणार आहे.
विशेष म्हणजे एकाच दिवसात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे पाच जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. कालच मुंबईत पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला दहा हजार कोटींचे पॅकेज द्यावे, अशी मागणी केली होती. तर शेतकऱ्यांच्या खात्यात आधी मदतीची रक्कम जमा करा, मग शहानिशा करा, असा टोलाही राज्यातील महायुती सरकारला लगावला होता. फडणवीस सरकारने जाहिरातबाजीवर पैसे खर्च न करता ते आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी द्यावेत, अशी खोचक टिप्पणीही केली होती.
धाराशिव (Dharashiv) जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जीवाची बाजी लावत पुरात अडकलेल्या वृद्ध आजीसह त्यांच्या कुटुंबातील अनेकांना सुखरूप बाहेर काढले होते. छातीभर पाण्यात हातात दोर घेत ओमराजे यांनी दाखवलेले धाडस यांचे राज्यभरात कौतुक होत आहे. स्वतः उद्धव ठाकरे यांनी फोन करून ओमराजे यांना शाबासकी दिली होती. आता उद्या, धाराशीव दौऱ्यात ते प्रत्यक्ष ओमराजे यांची पाठ थोपटणार आहेत.
असा आहे दौरा..
सकाळी साडेअकरा वाजता लातूर जिल्ह्यातील काडगाव येथे, दुपारी साडेबारा वाजता धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील इटकुर येथे, दुपारी दीड वाजता धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील पारगाव येथे उद्धव ठाकरे नुकसान झालेल्या शेत, घरं, पीकांची पाहणी करणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात म्हणजे दुपारी साडेतीन वाजता बीड जिल्ह्यातील कुर्ला येथे, साडेचार वाजता जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील महाकाळ तर सायंकाळी साडेपाच वाजता संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून ते पुन्हा मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.
प्र.१: उद्धव ठाकरे कोणत्या भागाचा दौरा करणार आहेत?
उ.१: ते मराठवाड्यातील पाच जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.
प्र.२: या दौऱ्याचा उद्देश काय आहे?
उ.२: पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी व परिस्थितीचा आढावा घेणे हा मुख्य उद्देश आहे.
प्र.३: हा दौरा कधी होणार आहे?
उ.३: हा दौरा उद्या म्हणजे एका दिवसात होणार आहे.
प्र.४: शेतकऱ्यांच्या कोणत्या समस्या मांडल्या जातील?
उ.४: पिकांचे नुकसान, भरपाईची मागणी आणि मदत योजनांचा आढावा घेतला जाणार आहे.
प्र.५: या दौऱ्याचा राजकीय परिणाम होईल का?
उ.५: होय, मराठवाड्यातील शेतकरी प्रश्नावर या दौऱ्याचा मोठा राजकीय परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.