Uddhav Thackeray : संकटकाळात 'या' नेत्याने साथ सोडली नाही, आता उद्धव ठाकरे...

Nanded News : दौऱ्याची जय्यत तयारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
 Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Nanded : शिवसेनेत राज्य पातळीवर उभी फुट पडल्यानंतर माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. नांदेड जिल्ह्यात त्यांनी शिवसेनेचे संघटनात्मक काम करत आहेत. त्यांच्या मुलीच्या विवाह सोहळा रविवारी (ता. १७) आहे. या लग्नसोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. ठाकरे येणार असल्याने लग्नं घरी एकच लगबग सुरू झाली आहे. शिवाय या लग्नसोहळ्याच्या निमित्त ठाकरे कार्यकर्त्यांना भेटणार असल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला आहे.

 Uddhav Thackeray
Maharashtra Assembly Winter Session : अशोक चव्हाणांनी लक्ष वेधताच मंत्री गुलाबराव पाटलांनी दिले 'हे' आश्वासन

रविवारी माजी मुख्यमंत्री पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे एक दिवसाच्या नांदेड दौऱ्यावर येत आहेत. माजी आमदार तथा शिवसेना जिल्हाप्रमुख नागेश पाटील आष्टीकर यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू आहे. दौऱ्याच्या तयारी संदर्भात नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली आहे. या दौऱ्यामुळे शिवसेना ठाकरे गटात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हादगावचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर हे शिवसेनेचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. शिवसेनेत राज्य पातळीवर उभी फुट पडल्यानंतर त्यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नाही. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे नांदेडला येणार असल्याने नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना ठाकरे गटाच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक शनिवारी(ता १६) सकाळी घेण्यात आली.

या बैठकीला नांदेड हिंगोली जिल्हाचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात ,राज्य संघटक एकनाथ पवार,सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटील कोकाटे, बाजार समितीचे उपसभापती भुजंग पाटील डक, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, माधव पावडे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.या बैठकीत तयारीचा आढावा घेण्यात आला.

(Edited By Roshan More)

 Uddhav Thackeray
Viksit Bharat Sankalp Yatra : इकडे योजनांची भीक अन् दुसरीकडे दरोडा; गावकऱ्यांनी 'संकल्प रथ' परत पाठवला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com