Uddhav Thackeray Hingoli Sabha : दादांचे बोट धरून भाजपमध्ये गेले अन् ईडी हसन मुश्रीफांचे घर विसरली ; ठाकरेंनी डिवचले

Uddhav Thackeray News : उद्धव ठाकरे यांची हिंगोलीमध्ये भाजपवर जोरदार टीका केली.
Uddhav Thackeray, Hasan Mushrif News
Uddhav Thackeray, Hasan Mushrif NewsSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : भ्रष्टाचाराबाबत भाजपला बोलण्याचा अधिकार नाही. मागील वर्षी एक रक्षाबंधनचा फोटो आला होता. एका ताईंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी बांधली आणि 'ईडी' थांबली. असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खासदार भावना गवळी यांचे नाव न घेता लगावला. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर 'ईडी'ने अनेक धाडी टाकल्या. मात्र, ते दादांचे बोट धरून भाजपसोबत गेले. त्यानंतर 'ईडी' त्यांचे घर विसरली, असा हल्लाबोल ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केला.

ठाकरे यांची हिंगोलीमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधला. ठाकरे म्हणाले, आम्ही 'इंडिया' म्हणून एकत्र आल्यानंतर लगेच आपले पंतप्रधान इतके घसरले आणि म्हणाले घमंडी आघाडी आहे. पूर्वी शाळेत एक प्राणी पाहिला होता अमिबा नावाचा. तसे 'एनडीए'चे झाले आहे. अमिबा सारखे कसेही वाढत आहेत. याचा पक्ष फोड त्यांचा पक्ष फोड असे करून 'एनडी'ए वाढवत आहेत.

Uddhav Thackeray, Hasan Mushrif News
Ambadas Danve News : मराठवाड्यात गद्दार गाडले जातील ; अंबादास दानवेंचा इशारा

'इंडिया'चे नाव घेऊन पुढे आलो आहोत. पंतप्रधान आफ्रिकेमध्ये गेले होते, तेव्हा चांद्रयान चंदावर गेले. तेव्हा, इंडियाचे पंतप्रधान म्हणून गेलात की 'इंडिया मुजाहिद्दीन'चे पंतप्रधान म्हणून गेला होतात, असा बोचरा सवाल ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना केला. अतिरेक्यांना पाठबळ पाकिस्तान दोतो. मग भारत-पाकिस्तान सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी (Narendra Modi) स्टेडियमवर कसा ? मग हे तुमचे देशप्रेम आहे का ? एका बाजूला आमच्यावर आरोप करायचे आणि तिकडे जाऊन मिठ्या मारायच्या हेच का तुमचे हिंदुत्व, असे सवाल ठाकरे यांनी केले.

Uddhav Thackeray, Hasan Mushrif News
Thackeray Attack On BJP : भाजपला नेते बाहेरचे लागतात अन्‌ वडील माझे लागतात; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मोदीजी हे तुम्हाला शोभत नाही. आमच्यावर घराणेशाही आरोप करता. होय मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. आमच्या घराण्याला काही इतिहास आहे, आणि तो संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. मी घरी जायचे की नाही ते माझी जनता सांगेन. इतर कुणी सांगण्याची गरज नाही. आमच्या घराण्याबद्दल बोलता मग माझा बाप कशासाठी चोरता. आम्ही एकत्र आलो आहोत, ते विरोधक नाहीत. आम्ही देशभक्त एकत्र आलो आहोत. आम्हाला भाजपाची एकाधिकार शाही संपवायची आहे. अनेक वर्षांनंतर 'एनडीए'ची बैठक झाली. निवडणुका आल्या की 'एनडीए' आठवते आणि निवडणुका झाल्यानंतर सगळ्यांना लाथा आणि मित्रांचा विकास हे आम्ही होऊ देणार नाही, असा इशाराही ठाकरे यांनी दिला.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com