Thackeray Attack On BJP : भाजपला नेते बाहेरचे लागतात अन्‌ वडील माझे लागतात; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

Hingoli Shivsena Sabha : मी भाजपबरोबरची युती तोडली असली तरी त्या कार्यकर्त्यांची मला दया येतो.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Hingoli : डबल इंजिन सरकारला आता अजितदादांचा तिसरा डबा लागला आहे. अजून किती डबे लागणार आहेत. काय हो तुमच्या पक्षात काय कर्तृत्व नाही का?. चांगले नेते तयार करण्याचे कर्तृत्व नाही. नेते बाहरेचे लागतात. वडील माझे लागतात. पक्ष फोडला; पण वडील माझे वापरायचे. दिल्लीतील तुमच्या वडिलांमध्ये मते मागायची हिम्मत राहिलेली नाही का?, असा सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला. (Uddhav Thackeray strongly criticized BJP in Hingoli)

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज हिंगोलीत सभा होत आहे. त्या सभेत ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटाचे आमदा संतोष बांगर यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, हे भाजपवाले माझे वडील चोरणार, इतर पक्षांतून नेते चोरणार आणि आम्ही हिंदू आहोत, अशा फुशारक्या मारणार. ही कसली डोंबल्याची ताकद, त्याला नामर्द आणि नामर्दानगी असं म्हणतात.

Uddhav Thackeray
Jaidatta Kshirsagar Indicate Statement : मी अजितदादांच्या सभेला जाणार नाही, पण योग्यवेळी योग्य निर्णय घेईन; जयदत्त क्षीरसागरांचे सूचक विधान

हे ट्रीपल इंजिन सरकार असा टेंभा मिरवला जात आहे. नुसत्याच थापा मारल्या जात आहेत. सरकार आपल्या दारी आणि योजना मात्र कागदावरी. सरकार आपल्या दारी आणि थापा मारतंय लय भारी. हे सरकार नुसतं थापा मारतंय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शासन आपल्या दारी या योजनेवर केली.

Uddhav Thackeray
Nanded Shivsena News : उद्धव ठाकरेंवर जेसीबीने पुष्पवृष्टी करू नका; नांदेड पोलिसांनी परवानगी नाकारली, शिवसैनिक संतप्त

सरकार म्हणून देशात बाजारबुणग्यांचा कारभार चालला आहे. हृदयात राम आणि हाताला काम असं आमचं हिंदुत्व आहे. पण भाजपचं राम, श्रीराम, श्रीराम आणि सगळेच आयाराम असं चालंल आहे. भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांनी पक्षासाठी आयुष्य घालवलं. पण ते राहिले नुसते दांड्यापुरते आणि उपरे फडफडत आहेत. उपरे थयथया नाचत आहेत आणि कट्टर कार्यकर्ते हे सतरंज्या होऊन पडलेले आहेत. एवढ्यासाठी तुम्ही मेहनत केली. मी भाजपबरोबरची युती तोडली असली तरी त्या कार्यकर्त्यांची मला दया येतो, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना चुचकारले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com