Uddhav Thackeray News : ...अन् उद्धव ठाकरेंनी 'त्या' शेतकऱ्याच्या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचं केलं जाहीर!

Uddhav Thackeray Visits Farmers : छत्रपती संभाजीनगरमधील शिव संकल्प मेळावा संपल्यानंतर निपाणी गावाजवळील शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला
Uddhav Thackeray Visits Farmers
Uddhav Thackeray Visits FarmersSarkarnama

Uddhav Thackeray at Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असलेले पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिव संकल्प मेळावा संपल्यानंतर निपाणी गावाजवळील शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. पेरणीची दिवस असल्याने बी- बियाणे व्यवस्थित मिळतात की नाही? पीक कर्जाची काय अवस्था आहे? अशा विविध प्रश्नावर त्यांनी शेतकऱ्यांना बोलते केले. याच वेळी तिथे उभ्या असलेल्या मुलाची चौकशी करत त्याच्या संपूर्ण शालेय शिक्षणाची जबाबदारीही घेतली.

उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी तालुक्यातील निपाणी गावातील विष्णू रामविलास लाहोटी यांच्या शेत बांधावर जाऊन शेतकरी बांधव व महिलांसोबत संवाद साधला. पेरणी झाल्याच्या एक महिन्यानंतरही पाऊस नसल्याने करपत असलेल्या शेतमालांची यावेळी त्यांनी पाहणी केली. बी - बियाणे, रासायनिक खते यांच्या दराची माहिती घेऊन वाढलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाची माहिती घेत दिलासा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Uddhav Thackeray Visits Farmers
CM Eknath Shinde : मराठवाड्यात अनुसूचीत जमातींच्या जात पडताळणी जाचाविरोधात लोकप्रतिनिधी आक्रमक; मुख्यमंत्री कसा सोडवणार पेच?

राज्य सरकार फसव्या घोषणा करत असुन त्यांचा लाभ स्थानिक पातळीवर आम्हाला मिळत नसल्याची खंत यावेळी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यक्त केली. तुमच्या कार्यकाळात झालेल्या कर्जमाफीचा आम्हाला फायदा मिळाला आहे. दोन लाखापर्यंत झालेली ही कर्जमाफी सर्वापर्यंत पोहोचली, अशी आठवण शेतकऱ्यांनी यावेळी सांगितली.

Uddhav Thackeray Visits Farmers
Sanjay Shirsat On Raju Shinde : छत्रपती संभाजीनगरात ठाकरे गटालाही धक्का बसणार? ; संजय शिरसाटांनी केलंय 'हे' सूचक विधान!

परंतु महायुतीचे सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असून पिक विमा, शेतकरी अनुदान व दुष्काळ अनुदान आलेले नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. रोजंदारीने शेतात कामासाठी आलेल्या एका महिलेसोबत शाळकरी मुलगा आलेला होता. त्यांच्याशी संवाद साधत हा मुलगा शाळेत का जात नाही? याची ठाकरे यांनी विचारपूस केली.

आर्थिक परिस्थिती वाईट असल्याने शाळेत प्रवेश घेता येत नसल्याची माहिती या महिलेने दिली. तेव्हा शिवसेना या मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे ठाकरेंनी सांगत या शेतकरी कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com