Uddhav Thackeray News : भाजपची सुपारी वाजवायला येणार असाल तर... ठाकरी भाषेत 'केसीआर' यांना इशारा

Shivsena News : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेख राव हे सध्या त्यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करत आहेत.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray Hingoli Sabha : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेख राव हे सध्या त्यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करत आहेत. 'बीआरएस'ने मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक नेत्यांनी 'बीआरएस'मध्ये प्रवेश केला आहे. 'अगली बार किसान सरकार' ही टॅगलाई घेऊन त्यांनी राज्यभरात मोठ्या प्रमाणात फ्लेक्सबाजी केली होती. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीतील सभेत 'बीआरएस'वर जोरदार निशणा साधला.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, काहीजण आता बाहेरच्या राज्यातून येत आहेत. जणू आपल्या राज्यात शेतकऱ्यांना कोणी वालीच राहीला नाही. एकतर त्यांची भाषा आणि आपल्या भाषेत फरक आहे. म्हणतात 'अगली बार किसान सरकार' अरे पण येथे माझ्यासोबत किसान बसला आहे ना. गद्दारांनी घात केला नसता तर मी शेतकऱ्यांचे भलेच केले असते. सांगा त्या नेत्यांना, आम्हाला उपऱ्यांची गरज नाही.

Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray News : '' ...तर महाराष्ट्राला देशातच नव्हे तर जगात अव्वल केलं असतं !''; ठाकरेंनी बोलून दाखवली खंत

हे भाजपची सुपारी वाजवायला येणार असतील, भाजप (BJP) विरोधातील मते फोडण्यासाठी येत असतील तर त्यांना सांगा आधी तुमचे घर सांभाळा. कारण तुमच्या घरात बुडाला सुरूंग लागलाय, त्यामुळे पहिले तिकडे बघा, असा जोरदार टोला उद्धव ठाकरेंनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना लगावला. महाराष्ट्रहितासाठी आपण ही लढाई भक्कम एकजुटीने लढू आणि हे महाराष्ट्रद्रोही सरकार फेकून देऊ, असा निर्धार यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray Sabha News : `एक फुल दोन हाफ`, उद्धव ठाकरेंनी उडवली शिंदे-फडणवीस-पवारांची खिल्ली..

सरकारी अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांचा सर्व्हे केला होता. एक लाख शेतकरी नैराश्याच्या गर्तेत आहेत, असे त्यांनी त्यामध्ये म्हटले होते. ती एकट्या मराठवाड्यातील आकडेवारी होती. त्यांचा तो पेरणीपूर्वीचा सर्व्हे होता. प्रत्येक शेतकऱ्यांना २५ हजार रुपये द्या, असा अहवाल त्यांनी राज्य सरकारला सादर केला होता. मात्र, शेतकऱ्यांना मदत तर मिळालीच नाही. पण, केंद्रेकर यांना मात्र स्वेच्छानिवृत्ती घ्यावी लागली, हे सरकार अधिकाऱ्यांनाही काम करू देत नाही, असा हल्लबोल ठाकरेंनी केला.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com