Uddhav Thackeray Sabha News : `एक फुल दोन हाफ`, उद्धव ठाकरेंनी उडवली शिंदे-फडणवीस-पवारांची खिल्ली..

Marathwada Political News : ठाकरेंच्या निर्धार सभेने मराठवाड्यातील निवडणूक प्रचाराचे रणशिंगच फुंकले.
Uddhav Thackeray Sabha News
Uddhav Thackeray Sabha NewsSarkarnama

Hingoli Political News : राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांच्या रुपाने राज्याला दोन उपमुख्यमंत्री लाभले. (Uddhav Thackeray Rall In Hingoli) राज्यात हा चेष्ठेचा विषय ठरत असतांनाच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीच्या सभेतून याच मुद्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंद आणि दोन उपमुख्यमंत्री फडणवीस-पवार यांची खिल्ली उडवली.

Uddhav Thackeray Sabha News
DCM Devendra Fadanvis News : विरोधकांच्या टीकेने सामान्यांची पोट भरणार नाहीत ; फडणवीसांनी सुनावले..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या रक्षाबंधनाला मुस्लिम महिलांकडून राख्या बांधून घेण्याचे आवाहन केल्याचा संदर्भ देत (Uddhav Thackeray) ठाकरेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली. मोदींनी मुस्लिम महिलांकडून राख्या बांधून घेण्याचे आवानह केले, तेच मी केले असते तर हे एक फूल दोन हाफ माझ्या अंगावर धावून आले असते, असा टोला ठाकरेंनी लगावला.

हिंगोलीच्या (Hingoli) जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी पाऊण तास घणाघाती भाषण केले. आमदार संतोष बांगर यांचा थोडक्यात समाचार घेतल्यानंतर संपुर्ण भाषणात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस, शिंदे आणि पंतप्रधान मोदी यांना निशाणा केले होते. (Shivsena) शिंदे-फडणवीस-पवार सरकार हे ट्रिपल इंजिन असल्याचा दावा करते.

परंतु राष्ट्रवादीचा एक गट अजित पवारांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील झाल्यानंतर उपमुख्यमंत्रीपदाची वाटणी झाली. फडणवीस-पवार हे दोन मुख्यमंत्री राज्याला लाभले. विरोधक यामुद्यावरून कायम टीकाही करतात. उद्धव ठाकरे यांनीही आजच्या सभेत दोन उपमुख्यमंत्रीपदाचा उल्लेख करत खिल्ली उडवली. विशेष म्हणजे ठाकरे यांनी फडणवीस, शिंदे, मोदी यांच्यावर यथेच्छ टीका केली असली, तरी अजित पवारांबद्दल त्यांनी थोडी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून आले.अजित पवार उपमुख्यमंत्री झाल्यानंतर विधीमंडळ अधिवेशना दरम्यान, ठाकरेंनी त्यांची विधानभवनात भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

त्यामुळे आजच्या सभेत ठाकरेंची पवारांबद्दलची भूमिका काहीशी मवाळ दिसून आली. या उलट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर मात्र ठाकरेंचा दाणपट्टा जोरात सुरू होता. शासन आपल्या दारी, म्हणजे थापा भारी म्हणत केलेली टीका आणि भाजप कार्यकर्त्यांच्या घरात जाऊनच योजनांची माहिती घेण्याचे शिवसैनिकांना केलेले आवाहन याची देखील चर्चा रंगू लागली आहे. हिंगोलीतील निर्धार सभेत केलेल्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी राज्य आणि देशपातळीवरील मुद्यांना हात घालत `इंडिया` या भाजपविरोधी आघाडीला बळ देण्याचे आवाहन देखील केले. ठाकरेंच्या निर्धार सभेने मराठवाड्यातील निवडणूक प्रचाराचे रणशिंगच फुंकले गेल्याची चर्चा होऊ लागली आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com