Sandeep Kshirsagar : बीडमध्ये काका - पुतण्या संघर्ष पेटला : भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप

Sandeep Kshirsagar : कर्मचार्‍यांकडून, एका महिन्याचे वेतन सक्तीने वसूल केल्याचा आरोप, संदीप क्षीरसागर यांनी केले आहेत.
Sandeep Kshirsagar
Sandeep KshirsagarSarkarnama
Published on
Updated on

बीड : बीडच्या राजकारणात काका - पुतणे संघर्ष पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (sandeep kshirsagar) यांनी माजी मंत्री व आता शिवसेनेत असलेले जयदत्त क्षीरसागर (jaydutta kshirsagar) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. जयदत्त क्षीरसागर हे संदीप क्षीरसागर यांचे काका आहेत. जयदत्त क्षीरसागर यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या नवगत शिक्षक प्रसारक मंडळ या शिक्षण संस्थेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत संदीप क्षीरसागर यांनी चौकशीची मागणी केली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा काका पुतण्या असा संघर्ष उभा राहिला आहे. (Latest Marathi News)

Sandeep Kshirsagar
एकदम Ok : शहाजी बापू म्हणाले, जयाभाऊच भावी मंत्री...

नवगण शिक्षण प्रसारक मंडळ ही माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शिक्षण संस्था आहे. याच संस्थेच्या अंतर्गत सुरू असलेल्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कर्मचार्‍यांकडून, एका महिन्याचे वेतन सक्तीने वसूल केल्याचा आरोप, संदीप क्षीरसागर यांनी केले आहेत. या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असून, याची चौकशी करण्यात यावी, असे संदीप क्षीरसागर म्हणाले. ज्यांचा पगार सक्तीने वसूल केला, त्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Sandeep Kshirsagar
Tanpure Vs Kardile : हा तर तीन गावांना पन्नास वर्षे मागे नेणारा निर्णय...

संदीप क्षीरसागर यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग सचिव, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग महासंचालक व बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू यांच्याकडे एका पत्राद्वारे तक्रार करत चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत, संस्थेवर प्रशासक नेमवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com