Vadwani APMC Election : महाविकास आघाडीने खाते उघडले,वडवणीत एकहाती सत्ता..

Ncp : आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे सर्व १८ सदस्य विजयी.
Vadwani APMC Election, News
Vadwani APMC Election, NewsSarkarnama
Published on
Updated on

Beed : वडवणी बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके, माजी आमदार केशव आंधळे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) पॅनलने सर्व १८ जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. भाजप प्रणित विरोधी पॅनलला इथे एकही जागा जिंकता आली नाही. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपच्या पॅनलमध्ये इथे थेट लढत होती.

Vadwani APMC Election, News
Latur APMC Election : लातूर बाजार समितीत देशमुखांचाच आवाज, भाजपला एन्ट्री नाहीच..

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळुंके (Prakash Solanke) व माजी आमदार केशव आंधळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी महाविकास आघाडीचे पॅनल तर त्यांच्या विरोधात राजाभाऊ मुंडे यांचे पॅनल होते. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार करण्यात आला होता. त्यामुळे दोन्ही पॅनलमध्ये जोरदार लढत होईल असे अपेक्षित होते, मात्र (Mahavikas Aghadi) महाविकास आघाडीने एकहाती सत्ता मिळवत विरोधकांना धूळ चारली.

भाजपसाठी हा मोठा धक्का समजला जात असून महाविकास आघाडीने मात्र जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीत आघाडी घेतल्याचे चित्र आहे. (Beed) कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा पहिला निकाल महाविकास आघाडीच्या बाजूने! वडवणी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत आमदार प्रकाश दादा सोळंके यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस व महाविकास आघाडीचे सर्व १८ सदस्य विजयी. या विजयाचे वाटेकरी असलेल्या सर्व कार्यकर्ते व मतदारांचे अभिनंदन!, असे ट्विट करत धनंजय मुंडे यांनी आनंद व्यक्त केला आहे.

विजयी उमेदवार.

सोसायटी मतदार संघ : १) खोटे रोहिदास अश्रुबा २)गरड शिवाजी आनंदराव ३)नाईकवाडे नंदकुमार निवृत्ती ४) मस्के दिनेश बन्सीधरराव ५) शेळके प्रदीप राजेंद्र ६)शिंदे अमरसिंह पंजाबराव ७) शिंदे संभाजी मुरलीधर ८) शेख दिलशादबी समशेर ९) शेळके अनुराधा नारायण १०) चोले अनिल अश्रुबा ११) शिंदे विश्वनाथ भगवान. ग्रामपंचायत मतदार संघ : १२) बादाडे अतुल बंडू १३) लंगडे सचिन सुखदेवराव १४) मांजरे बबन धुराजी १५) कदम अभिमान अर्जुन. व्यापारी मतदार संघ : १६) अंडील पांडुरंग अंबादास १७) धस रणजीत मधुकर, तर मापाडी मतदार संघ १८) साळवे भिकाराम धर्मराज.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com