Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडच्या CID ने मुसक्या आवळल्यानंतरही संतोष देशमुख यांच्या मुलीने उपस्थित केला 'हा' मोठा प्रश्न

Santosh Deshmukh Case Walmik Karad Surrender : "संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. मात्र, राजकीय रोशापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे. पोलिस तपासाचे निष्कर्ष येतील आणि त्यात जर मी मी दोषी आढळलो तर मला न्याय देवता देईल ती द्यावी ती मी भोगायला तयार आहे."
Walmik Karad, Santosh Deshmukh, Vaibhavi Deshmukh
Walmik Karad, Santosh Deshmukh, Vaibhavi DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Walmik Karad Surrender : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच मास्टरमाइंड असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून केला जात होता. शिवाय देशमुख यांची हत्या झाल्यापासून वाल्मिक कराड फरार होता. मात्र, अखेर आता त्याने पुण्यात सीआयडीसमोर (Pune CID) शरणागती पत्करली आहे.

वाल्मिक कराड सीआयडीला शरण येणार असल्यामुळे त्याच्या समर्थकांची गर्दी होणार हे लक्षात घेता पुणे पोलिसांकडून (Pune Police) सीआयडी कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. तर 22 दिवसांनंतर कराड स्वत: पोलिसांना शरण आला असला आहे. मात्र, याच मुद्द्यावरून संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हीने काही प्रश्न उपस्थित केले आहेत.

आरोपी स्वत: शरण आला असेल तर यात पोलिसांनी काय कारवाई केली? असा सवाल तिने उपस्थित केला आहे. वाल्मिक कराडच्या (Walmik Karad) शरणागती पत्करताच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख यांनी पोलिस यंत्रणेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. वैभवी म्हणाली, "आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे हीच आमची आहे.

Walmik Karad, Santosh Deshmukh, Vaibhavi Deshmukh
Walmik karad Surrender Video : कार्यकर्ते पांगले, बंदोबस्त हटला..! 'CID'लाही गुंगारा देणाऱ्या वाल्मिक कराडने एन्ट्रीचे टायमिंग साधले...

पोलिस यंत्रणा काम करते आहे तर मग आरोपीला पकडायला येवढा वेळ का लागत आहे? शिवाय गुन्हेगार स्वत: सरेंडर होत असेल तर मग पोलिस यंत्रणा काय काम करतेय? आरोपींना पकडायला इतका वेळ का लागत असेल तर आम्हाला न्याय कसा मिळणार? असे प्रश्न वैभवीने उपस्थित केले. शिवाय यावेळी तिने माझ्या वडिलांची ज्यांनी क्रूर हत्या केली, त्यांना अटक करा आणि फरार असलेल्या आरोपींना अटक करा, असंही तिने म्हटलं आहे.

शरण येण्यापूर्वी वाल्मिम कराड काय म्हणाला?

तर वाल्मिक कराड पोलिसांना शरण येण्याआधी एक व्हिडिओ शेअर करत आपला संतोष देशमुख हत्येशी संबंध नसल्याचं म्हटलं आहे. त्याने या व्हिडिओत म्हटलं की, "मी वाल्मीक कराड केज पोलिस स्टेशनमध्ये खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाली आहे. मला अटकपूर्व अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे येथे सरेंडर होत आहे.

Walmik Karad, Santosh Deshmukh, Vaibhavi Deshmukh
Walmik Karad Surrender : मोठी बातमी! अखेर वाल्मिक कराडची सीआयडीसमोर शरणागती

संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना त्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. मात्र, राजकीय रोशापोटी माझं नाव त्यांच्याशी जोडले जात आहे. पोलिस तपासाचे निष्कर्ष येतील आणि त्यात जर मी मी दोषी आढळलो तर मला न्याय देवता देईल ती द्यावी ती मी भोगायला तयार आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com