
Pune News : गेल्या दोन दिवसापासून वाल्मीक कराड हे 'सीआयडी'ला शरण येणार असल्याच्या बातम्या सुरू होत्या. मात्र, आज सकाळपासून कराड अकरा वाजता सीआयडी ऑफिसमध्ये शरण घेणार असल्याच्या बातम्या सुरू झाल्या. यानंतर पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त पाषाण परिसरातील सीआयडी ऑफिसच्या लगत लावला. तसेच बीड परिसरातून वाल्मीक कराड याचे कार्यकर्ते देखील या परिसरात मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते. या परिसरात कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
मात्र, पोलिसांकडे वाल्मीक कराड हा शरण येणार असल्याबाबतच्या अधिकृत अशी कोणतीही माहिती नसल्याने हळूहळू बंदोबस्त कमी करण्यात आला. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील या परिसरात न निघून गेले त्यानंतर वाल्मीक कराड हे आज शरण येण्याची शक्यता कमी असल्याचं वाटत असतानाच वाल्मिक कराड एका पांढऱ्या स्कॉर्पिओमध्ये सीआयडी ऑफिसमध्ये दाखल झाले.
त्यांच्यासोबत बीड येथील दोन नगरसेवक देखील होते. मीडियापासून वाचण्यासाठी वाल्मीक कराड हा मधल्या सीटमध्ये लपून बसले होते. गाडी अत्यंत वेगाने सीआयडी ऑफिसच्या गेट वरती पोहोचली.
वाल्मिक कराड गेट वर आलेला दिसताच गेट वरती असलेल्या दोन पोलिसांनी अचानक त्यांना ताब्यात घेतलं. कार्यालयात नेलं यादरम्यान माध्यमांनी वाल्मीक कराड यांना गेले आठ दिवस तुम्ही कुठे होता याबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी हात जोडत प्रश्नांना उत्तर देण्यास नकार दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.