Ajit Pawar : मुख्यमंत्री शिंदेंचा सांगावा! अजितदादा नाशिक दौरा सोडून तातडीने मुंबईकडे रवाना

Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज रात्री 11 वाजता ही बैठक होणार आहे. त्या बैठकीसाठी अजित पवार यांनी नाशिकचा दौरा अर्धवट सोडून मुंबईला रवाना झाले आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : विधानसभा निवडणुकीमुळे सर्व पक्षांचे प्रमुख नेते विविध मार्गांनी मतदारांना भेटत असल्याचे दिसून येत आहे. राज्यात सध्या निघालेल्या राजकीय यात्रांनी वातावरण ढवळून निघाले आहे. महायुतीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीने गुरुवारी नाशिकमधून जनसन्मान यात्रेचा शुभारंभ केला आहे.

आता ही यात्रा अर्धवट सोडून अजित पवारांना तातडीने मुंबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे महायुतीत नेमकं काय शिजतंय, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झालेली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी दोन्हीही उपमुख्यमंत्री हजर राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी आज रात्री 11 वाजता ही बैठक होणार आहे. त्या बैठकीसाठी अजित पवार यांनी नाशिकचा दौरा अर्धवट सोडून मुंबईला रवाना झाले आहेत.

या जनसन्मान यात्रेपूर्वी अजित पवारांनी काळाराम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. त्यानंतर सुरू झालेल्या यात्रेत त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. 'लाडक्या बहिणीं'नी दादांना राख्या बांधल्या. यावेळी आयोजित सभेतून अजित पवारांनी सरकारच्या सर्व योजनांवर माहिती दिली. यात प्रामुख्यमाने शेतकरी, महिलांसाठी केलेल्या योजनांना उहापोह त्यांनी केला.

Ajit Pawar
Ambadas Danve : नियम धाब्यावर बसवून महसूल विभागात बदल्या; अंबादास दानवेंच्या आरोपाने खळबळ

अजितदादांनी लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष सुरू राहणार असल्याची ग्वाही दिली. राज्याचा 10 वर्षे अर्थमंत्री राहिलो असल्याने मला कुठे बचत करून योजनेला पैसे देता येतात, याची माहिती आहे. विरोधक लाडकी बहीण योजना बंद होणार असे सांगतात. मात्र, पुढील पाच वर्षे ही योजना सुरू राहील. हा अजितदादाचा वादा आहे. 17 ऑगस्टला योजनेचे दोन हप्ते पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होतील, असा दावाही अजित पवारांनी केला.

राज्यातील शेतकऱ्यांना आता शेतीच्या वीज बिल भरावे लागणार नाही. त्यामुळे आतापर्यंत आलेल्या शेतीच्या पंपाचे बिल भरण्याची गरज नाही. वीज कनेक्शन कापण्यासाठी वायरमन आलाच तर त्याला सांगा अजितदादाने सांगितले आहे, अशी मिश्किल टिप्पणीही अजितदादांनी केली. दिंडोरीत जनसन्मान यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला.

Ajit Pawar
Video Bachchu Kadu : बच्चू कडूंची सटकली! अधिकाऱ्याच्या कानाखालीच लगावली; नेमकं काय घडलं?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com