Vanchit Bahujan Aghadi : लाडक्या बहिणींसाठी 'सामाजिक न्याय'च्या निधीचा वापर : वंचित बहुजन आघाडीचा संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर मोर्चा

Sanjay Shirsat : संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर वंचित बहुजन आघाडीने मोर्चा काढला. एससी-एसटी निधी लाडकी बहीण योजनेकडे वळवल्याचा आरोप करत आंदोलकांनी शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
Sanjay Shirsat
Sanjay ShirsatSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील बंगल्यावर आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. नगरसेवक तथा वंचित आघाडीचे नेते अमित भुईगळ यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाला मंत्री संजय शिरसाट यांच्या कन्या नगरसेवक हर्षदा शिरसाट सामोरे गेल्या. त्यांनी वंचितच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर आंदोलक माघारी फिरले.

महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेसाठी विविध खात्याचा निधी वर्ग करण्यात येत आहे. याचा सर्वाधिक फटका हा सामाजिक न्याय विभागाला बसत आहे. स्वतः संजय शिरसाट यांनी याबद्दलची नाराजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे वेळोवेळी बोलून दाखवली. मात्र निधी वळवण्याचे चक्र काही केल्या थांबत नाही.

नुकताच एससी, एसटींसाठीचा तब्बल चार हजार कोटींचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. संजय शिरसाट यांच्या खात्याचा कोट्यावधी रुपयांचा निधी वळवला जात असताना ते मुगगिळून गप्प का आहेत? असा सवाल करत आंदोलकांनी त्यांच्यावर कमीशनखोरीचा आरोप करत त्यांनी खुर्ची सोडावी, अशी मागणी केली आहे.

Sanjay Shirsat
Maharashtra Political Live Update : पुण्याच्या गणेशोत्सवात अजितदादांच्या आठवणींना मिळणार उजाळा

वंचित बहुजन आघाडीचे शेकडो कार्यकर्ते आणि एससी, एसटी समाज बांधव आज थेट मंत्री संजय शिरसाट यांच्या बंगल्यावर धडकले. एससी-एसटीचा निधी लुटत मंत्री संजय शिरसाट यांनी कमिशनखोरी केल्याचा आरोप मोर्चेकऱ्यांनी केला. तसेच त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील केली.

लाडकी बहीण योजनेसाठी एससी-एसटीच्या हक्काचा ४६०१.१३ कोटी निधीची लूट करण्यात आली. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्यावर कमिशनखोरीचा आरोप करत एकाच वेळी छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ येथील घरांवर एससी-एसटी समाजाने वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात मोर्चा काढत आंदोलन केले.

Sanjay Shirsat
Amit Thackeray On Maratha Reservation : मनोज जरांगेंची राज ठाकरेंवर जिव्हारी लागणार टीका पण अमित ठाकरेंनी मराठ्यांचं मन जिंकलं, थेट आदेश दिला

शेकडो आंदोलक संजय शिरसाट यांच्या पैठण-वाळूज रोडवरील बंगल्यावर धडकले. पोलिसांनी बॅरिकेट लावून त्यांची वाट अडवली. यावेळी मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करत संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शिरसाट यांच्या कन्या हर्षदा यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. त्यानंतर आंदोलक माघारी फिरले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com