Vanchit Bahujan Aghadi News : संभाजीनगरात अखेर वंचितकडून 'एमआयएम'ला बाय!

Loksabha Election Chhatrapati Sambhajinagar : मुदत संपून गेली तरी वंचित आघाडीकडून कुणालाही एबी फॉर्म देण्यात आला नाही, त्यामुळे या पक्षाकडून कोणाचीही उमेदवारी दाखल झाली नाही. त्यामुळे संभाजीनगरात अखेर वंचितकडून 'एमआयएम'ला बाय!
Vanchit Bahujan Aghadi News : संभाजीनगरात अखेर वंचितकडून 'एमआयएम'ला बाय!
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : वंचित बहुजन आघाडीने अखेर छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात एमआयएमला बाय दिल्याचे स्पष्ट झाले आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. मुदत संपून गेली तरी वंचित आघाडीकडून कुणालाही एबी फॉर्म देण्यात आला नाही, त्यामुळे या पक्षाकडून कोणाचीही उमेदवारी दाखल झाली नाही. Latest News of Loksabha Election

वंचितने Vanchit Bahujan Aghadi अफसर खान यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात त्यांनी प्रचाराला सुरुवात केली होती. पण काल वंचितकडून आपल्याला एबी फॉर्म मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर अफसर खान यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. एमआयएमचे विद्यमान खासदार व उमेदवार इम्तियाज जलील Imtiaz Jalel व त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी Asaduddin Owaisi यांनी प्रकाश आंबेडकर व त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर Anandraj Ambedkar यांना अकोला आणि अमरावती लोकसभा मतदारसंघातून पांठिबा जाहीर केला होता.

त्याची परतफेड म्हणून वंचितने इम्तियाज जलील यांना बाय दिल्याची चर्चा होत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अद्यापही एमआयएला पाठिंबा देण्याची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण उमेदवार न देता अप्रत्यक्षरिता अघोषित पाठिंबाच जाहीर केला आहे. इकडे महायुतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करत संदीपान भुमरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. AIMIM Maharashtra News 

Vanchit Bahujan Aghadi News : संभाजीनगरात अखेर वंचितकडून 'एमआयएम'ला बाय!
Dharashiv Lok Sabha News : तुळजापूर मुक्कामी शरद पवारांचा प्लॅन ठरला; 'या' नेत्याने घेतली गुप्तभेट?

स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना निवडून देण्याचे आवाहन केले. शिंदे यांनी आपल्या भाषणात एमआयएम किंवा या पक्षाचे उमेदवार इम्तियाज जलील यांचा साधा उल्लेखही केला नाही. आपली लढत महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांच्याशीच असल्याचे स्पष्ट करत त्यांनी एमआयएमची दखल घेतली नाही. गेल्यावेळी थोडी चूक झाली, पण आता दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार नाही, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

विनोद पाटील Vinod Patil यांना माघार घ्यायला लावून मुख्यमंत्र्यांनी आर्धी बाजी मारल्याची चर्चा आहे. दरम्यान, वंचितने एबी फॉर्म न दिलेले अफसर खान यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. परंतु उमेदवारी अर्ज छाननीपर्यंत खान यांना वंचितकडून एबी फॉर्म दिला जाऊ शकतो, अशीही चर्चा या निमित्ताने होत आहे. प्रकाश आंबेडकर स्वतः या संदर्भात काय भूमिका घेतात? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

R

Vanchit Bahujan Aghadi News : संभाजीनगरात अखेर वंचितकडून 'एमआयएम'ला बाय!
Ambadas Danve On Sandipan Bhumre : तुमची अगरबत्ती मध्येच कुठे ओवाळतायं ? मराठा समाज तुम्हालाच घरी बसवणार; भुमरेंना दानवेंचा टोला..

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com