Sambhajinagar Lok Sabha 2024 : दोन तास उरले, वंचितचे अजून ठरेना; एमआयएमला संभाजीनगरात छुपा पाठिंबा?

MIM-Vanchit Bahujan Aghadi News : आंबेडकरांनी एमआयएमच्या पाठिंब्यावर कुठले जाहीर भाष्य केले नसले तरी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 12 पर्यंत वंचितच्या घोषित केलेल्या उमेदवाराला एबी फाॅर्म दिला नव्हता, की नव्या उमेदवाराची घोषणा केली होती, त्यामुळे एमआयएमच्या जाहीर पाठिंब्याला वंचितने छुपा पाठिंबा जाहीर केला की काय? या चर्चेला उधाण आले आहे.
Imtiaz Jalil-Prakash Ambedkar
Imtiaz Jalil-Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar, 25 April : औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) लोकसभेची जागा आमची आहे, ती कशी सोडणार? असा दावा करत लढण्याची भाषा करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी वेगळाच निर्णय घेतला. महाविकास आघाडीसोबत बोलणी सुरू असताना संभाजीनगरातच आंबेडकरांनी ही आमची सीट आहे, ती कशी सोडणार? असे म्हणत उमेदवार देण्याची तयारी केली होती.

काँग्रेसचे माजी नगरसेवक अफसर खान यांचा एका दिवसात पक्षात प्रवेश आणि दुसऱ्या दिवशी संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. वंचितने विद्यमान खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांच्या मुस्लिम वोट बँकेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केल्याची चर्चाही राज्यभरात झाली. परंतु एमआयएमने अकोला, अमरावती या दोन्ही लोकसभा मतदारसंघात अनुक्रमे प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Imtiaz Jalil-Prakash Ambedkar
ShahajiBapu Vs Jankar : फडणवीसांना भेटूनही उत्तम जानकर शरद पवारांकडे का गेले?; शहाजीबापूंची मार्मिक टिप्पणी...

अमरावतीत तर इम्तियाज जलील यांनी स्वतः जाऊन सभा घेतली. आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) एमआयएमच्या (MIM) पाठिंब्यावर कुठले जाहीर भाष्य केले नसले तरी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी दुपारी 12 पर्यंत वंचितच्या घोषित केलेल्या उमेदवाराला एबी फाॅर्म दिला नव्हता, की नव्या उमेदवाराची घोषणा केली होती, त्यामुळे एमआयएमच्या जाहीर पाठिंब्याला वंचितने छुपा पाठिंबा जाहीर केला की काय? या चर्चेला उधाण आले आहे.

अफसर खान यांची वंचितकडून उमेदवारी जाहीर होण्याआधी गेल्यावेळी अपक्ष लढलेले हर्षवर्धन जाधव इच्छुक होते. पण, त्यांचा विचार वंचितने केलाच नाही. अफसर खान यांना वंचित एबी फाॅर्म देणार नाही, याची कुणकूण लागल्याने त्यांनी कालच अपक्ष लढण्याची घोषणा केली. तसेच 26 किंवा 27 तारखेला आपल्या वंचितचा एबी फाॅर्म मिळू नये; म्हणून कोणी प्रयत्न केले? नेमकं काय घडलं, याबाबत सविस्तर बोलणार असल्याचे स्पष्ट केले.

Imtiaz Jalil-Prakash Ambedkar
Solapur NCP : उत्तम जानकरांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी काहीही संबंध नाही; जिल्हाध्यक्षांनी सुनावले

एकूणच प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीनगरात जाहीर नाही, पण एमआयएमच्या इम्तियाज जलील यांना छुपा पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे वंचितच्या एकाही नेत्याने संभाजीनगर लोकसभेच्या जागेबद्दल काय भूमिका आहे, हे अद्यापही अधिकृतपणे स्पष्ट केलेले नाही. आनंदराज आंबेडकर यांनी आधीच इम्तियाज जलील त्यांच्या निवासस्थानी स्नेह भोजनाच्या भेटीत पाठिंब्याचा शब्द दिला होता.

आता आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेच्या पाठिंब्यांतर वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आपल्याच जाहीर केलेल्या उमेदवारा एबी फाॅर्म नाकारात अप्रत्यक्षरित्या पाठिंबा दिल्याचे दिसते. दुपारी तीनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ आहे. त्यामुळे येत्या दोन तासांत आणखी काही घडामोडी घडतात का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Imtiaz Jalil-Prakash Ambedkar
Nashik Constituency 2024: महायुतीचा गोंधळ तर महाविकास आघाडीचे सोमवारी शक्तिप्रदर्शन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com