Nashik Constituency 2024: महायुतीचा गोंधळ तर महाविकास आघाडीचे सोमवारी शक्तिप्रदर्शन

Nashik And Dindori Lok Sabha Election : नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार सोमवारी अर्ज दाखल करताना शहरात रॅली काढून शक्तिप्रदर्शन करणार आहे. त्यामुळे सोमवारचा दिवस नाशिक शहरातील लोकसभा निवडणुकीच्या राजकीय शक्तिप्रदर्शनाचा ठरणार आहे.
Shivsena UBT News
Shivsena UBT NewsSarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT News : नाशिकच्या उमेदवारीबाबत महायुतीचा घोळ आहे. महाविकास आघाडीने MVA मात्र प्रचारात आघाडी घेतली आहे. आघाडीचे दोन्ही उमेदवार सोमवारी शक्तिप्रदर्शन करीत शिवसेना नेते संजय राऊत Sanjay Raut आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil यांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

महाविकास आघाडीचे MVA नाशिक मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे Uddhav Thackeray गटाचे राजाभाऊ वाजे Rajabhau Waje सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. दिंडोरी मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे भास्करराव भगरे Bhaskarrao Bhagare हे देखील याचवेळी अर्ज दाखल करतील. महाविकास आघाडी Mahavikas Aghadi उमेदवारी अर्ज दाखल करताना शहरात रॅली काढून शक्तिप्रदर्शन करणार आहे. त्यामुळे सोमवारचा दिवस नाशिक शहरातील लोकसभा निवडणुकीच्या राजकीय शक्तिप्रदर्शनाचा ठरणार आहे.

Shivsena UBT News
Nana Patole News: नानाभाऊ, व्हेंटिलेटर तर काढलेच नाही....

जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघात Dindori Matdarsangh भारतीय जनता पक्षाने विद्यमान केंद्रीय मंत्री डॉ भारती पवार Bharati Pawar यांना उमेदवारी दिली आहे. मात्र नाशिक मतदारसंघ महायुतीतील कोणत्या राजकीय पक्षाला मिळणार यावरून वाद आहे. त्यावर एकमत होत नसल्याने अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. येथून विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार आहेत. उद्यापासून निवडणूक प्रक्रिया सुरू होत आहे. मात्र अद्यापही महायुतीने उमेदवार निश्चित केलेला नाही. आज सायंकाळी याबाबतची घोषणा होणे अपेक्षित आहे. महायुतीत हा गोंधळ सुरू असताना महाविकास आघाडीने उमेदवार जाहीर करण्याबरोबरच प्रचारात देखील आघाडी घेतली आहे.

शिवसेना नेते खासदार राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांसह महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांचे स्थानिक नेते उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थित असतील. सोमवारी सकाळी गोल्ड क्लब मैदानावरून महाविकास आघाडीची रॅली निघणार आहे. ही रॅली शहरातील शालिमार मेन रोड या भागातून जिल्हाधिकारी कार्यालयावर जाईल. या ठिकाणी नेते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. त्यामुळे सोमवारचा दिवस महाविकास आघाडीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यासाठी मतदारसंघातील सर्व भागातून पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक वाहने घेऊन शहरात येणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे शक्तिप्रदर्शन चर्चेचा विषय आहे.

Shivsena UBT News
Jayant Patil on Ajit Pawar : 'भारतरत्न देण्याची घोषणा केली; मात्र दादांचं दिल्लीत ऐकतं कोण ?'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com