Vidya Chavan : भाजपाला सत्तेमध्ये येऊन आठ वर्षे झाली, तरीही...; विद्या चव्हाणांची टीका

NCP : राष्ट्रवादीच्या दुसऱ्या टप्प्यातील जनजागर यात्रेला जिजाऊ जन्मस्थळ येथून जिजाऊंच्या पूजनाने सुरुवात झाली.
Vidya Chavan
Vidya ChavanSarkarnama

Maharashtra Politics News :केंद्र व राज्य सरकारचे महागाई व युवकांच्या रोजगाराकडे लक्ष नसल्याचे टीका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी केली. आज राष्ट्रवादीच्या दुसऱ्या टप्प्यातील जनजागर यात्रेला जिजाऊ जन्मस्थळ येथून जिजाऊंच्या पूजनाने सुरुवात झाली. यावेळी विद्या चव्हाण बोलत होत्या.

Vidya Chavan
Arvind Kejriwal Meet Uddhav Thackeray : दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल 'मातोश्री'वर जाणार, विरोधकांची मोट बांधणार?

चव्हाण म्हणाल्या,''राज्यातील सत्ताधारी गुजरातची हुजरेगिरी करण्यात मग्न आहे. इंग्रजांचे डीवाईड अँड रुल प्रमाणे हे सरकार देशात व राज्यात धार्मिक तेढ निर्माण करण्यात व्यस्त आहे. महागाईने सामान्य जनता, महिला, शेतकरी होरपळून जात आहे. सत्तेत आलेल्या मोदी सरकारने दरवर्षी २ कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते.

भाजपाला सत्तेमध्ये येऊन ८ वर्षे झाली तरी सुद्धा तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली नाही. फक्त आश्वासनाची खैरात करण्यात येत आहे. ४०० रुपयांना मिळणारे सिलेंडर आता १२०० रुपयांना दिले जात आहे. यामुळे सामान्य नागरिक, महिलांचे आर्थिक गणित कोलमडले आहे'', असं म्हणत त्यांनी भाजपवर टीका केली.

Vidya Chavan
ShahajiBapu Patil : राऊतांचं आडनाव बदलून आगलावे करा; शहाजीबापू पाटील अन् राऊतांमध्ये जुंपलं

''जिजाऊ माँ साहेब यांच्या जन्मानंतर राजे लखुजीराव जाधव यांनी हत्तीवरून साखर वाटली होती. त्याकाळी राज्यांनी महिलांचा सन्मान करण्याची शिकवण या महाराष्ट्राला दिली. मात्र, आताच्या सरकारच्या सत्ता काळात महिलांना महागाईच्या खाईत लोटून हे सरकार महिलांची आर्थिक कुचंबणा करीत आहे'', असा आरोप विद्या चव्हाण यांनी केला.

Vidya Chavan
Phaltan : सर्व विकास कामांचे श्रेय रामराजेंना; मला श्रेयवादात पडायचे नाही : निंबाळकर

भाजपचे हिंदुत्व ढोंगी असून आमच्यासाठी भगव्याचा अर्थ त्याग असा आहे. धर्माधर्मात भांडण लावून हे लोक आनंद घेत असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे हे म्हणाले की, ''सिंदखेड राजा मतदार संघातील अनेक विकास विषयक प्रश्नांवर आपण सरकारला विधानसभेत प्रश्न विचारले.

मात्र, सरकारने एकही प्रशांचे उत्तर दिले नाही. हे सरकार स्थापन झाल्यानंतर मतदार संघातील सर्व विकास कामांना स्थगिती दिली. या विरोधात आता आम्ही हायकोर्टात दाद मागितली असल्याची माहिती'', शिंगणे यांनी यावेळी बोलताना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com