Sanjay Raut and 
Shahjibapu Patil
Sanjay Raut and Shahjibapu PatilSarkarnama

ShahajiBapu Patil : राऊतांचं आडनाव बदलून आगलावे करा; शहाजीबापू पाटील अन् राऊतांमध्ये जुंपलं

Sanjay Raut : ''शहाजीबापू पाटील यांनीही शहाजी नाव बदललं पाहिजे...''

Maharashtra Politics News : एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता आमदार शहाजी बापू पाटील यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

''संजय राऊत यांचं नाव बदलून संजय आगलावे असं करायला हवं'', अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी एका वृत्तवाहीनीशी बोलताना केली. त्यामुळे पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Sanjay Raut and 
Shahjibapu Patil
Shivsena News: पूर्व विदर्भात उद्यापासून शिवसंवाद, ठाकरेंच्या सैनिकांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न !

शहाजीबापू पाटील म्हणाले, ''संजय राऊत यांचे आडनाव बदलून संजय आगलावे असं ठेवायला हवं. कारण ते महाराष्ट्रभर आग लावत फिरत आहेत. रोज सकाळी सकाळी ते उठतात आणि महाराष्ट्रभर आग लावण्याचे काम ते करतात. त्यामुळे नाव बदलून संजय आगलावे असं ठेवायला पाहिजे'', असा टोला त्यांनी राऊतांना लगावला.

Sanjay Raut and 
Shahjibapu Patil
Kasba By-Election : लोकसेवा असो किंवा निवडणूक आयोग निकालाला महत्त्व : मुख्यमंत्र्यांचं सूचक विधान !

''श्रीकांत शिंदे हे चांगलं काम करणारं तरुण नेतृत्व आहे. पण ते अशा तरुण नेतृत्वावर असे आरोप करतात. त्यांना हे शोभत नाही. संजय राऊत यांनाच काय ते कुणालाच शोभत नाहीत. मात्र, तरी देखील बेभान झालेले राऊत सध्या कुणाविषयी काय बोलतील याचा काही नेम नाही. संजय राऊत हे मातोश्रीशी एकनिष्ठ आहेत असं मला कधीही वाटलं नाही'', असं शहाजीबापू पाटील म्हणाले.

Sanjay Raut and 
Shahjibapu Patil
Chandrashekhar Bawankule News: येत्या आठ महिन्यात ठाकरेंकडे चारच लोक राहतील; बावनकुळेंचा दावा

दरम्यान, शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केल्यानंतर राऊत यांनीही जोरदार प्रतिउत्तर दिलं. ''शहाजीबापू पाटील यांनीही शहाजी नाव बदललं पाहिजे. यामुळे भोसले घराण्याचा अपमान होतोय'', असा टोला त्यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com