Marathwada Teacher Constituency Result : महाविकास आघाडीचे विक्रम काळे चौथ्यांदा विधान परिषदेवर ; भाजप पुन्हा पराभूत..

Aurangabad : २५ हजार ३८६ मतांचा कोटा ठरवण्यात आला होता. परंतु पहिल्या पसंतीत हा कोटा पुर्ण न झाल्यामुळे दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली.
Marathwada Teacher Constituency Result News, Aurangabad
Marathwada Teacher Constituency Result News, AurangabadSarkarnama
Published on
Updated on

२५Aurangabad : औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे विक्रम काळे (Vikram Kale) हे चौथ्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले आहेत. त्यांनी भाजप-युतीचे उमेदवार किरण पाटील यांचा ६ हजार ९३७ मतांनी पराभव केला.

Marathwada Teacher Constituency Result News, Aurangabad
Marathwada Teacher Constituency Result : विजय तर होणारच, पण तो सोपा हवा होता ; काळेंची खंत..

काळे यांना २५ हजार ३८० तर किरण पाटील यांना १६ हजार ६८३ मते मिळाली. तर तिसऱ्या क्रमांकावर (Marathwada) मराठवाडा शिक्षक संघाचे अपक्ष उमेदवार सुर्यकांत विश्वाराव हे होते. त्यांना १४ हजार १२८ इतकी मते मिळाली. (Bjp) वंचित आघाडी, कालिदास माने, प्रहारचे संजय तायडे यांचा प्रभाव निवडणुकीत जाणवला नाही.

एकूण १४ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. परंतु मराठवाडा शिक्षक संघाच्या सुर्यकांत विश्वासराव यांना अनपेक्षितपणे लक्षवेधी मते मिळवली आणि दुहेरी वाटणारी लढत तिरंगी झाली.

पहिल्या पंसतीसाठी २५ हजार ३८६ मतांचा कोटा ठरवण्यात आला होता. परंतु पहिल्या पसंतीत हा कोटा पुर्ण न झाल्यामुळे दुसऱ्या पसंतीची मते मोजण्यात आली. चौदा फेऱ्याच्या मतमोजणी अखेर विक्रम काळे यांचा विजय झाला. मतमोजणीस सकाळी ८ वाजता सुरुवात झाली, ती रात्री उशीरापर्यंत सुरू होती.

विजय दृष्टीपथात असल्याने अधिकृत घोषणा होण्याआधीच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत जल्लोष सुरू केला होता. महाविकास आघाडीचे जिल्ह्यातील नेते यावेळी उपस्थितीत होते. मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण, शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे हे दखील या जल्लोषात सहभागी झाले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com