Maharashtra Assembly Election 2024 : जिल्हा परिषदेचा सभापती असताना विकासकामांना प्राधान्य देत गावागावांत मूलभूत सोयी-सुविधा देण्याचे प्रामाणिकपणे काम केले, या पुढे पैठण मतदारसंघात विकास कामे निरंतर सुरुच ठेवणार असल्याची ग्वाही, पैठण विधानसभेचे महायुतीचे उमेदवार विलास भुमरे यांनी दिली.
पैठण (Paithan) विधानसभा मतदारसंघातील थापटी, एकतुनी, एकतुनी तांडा, देवगाव, देवगाव तांडा, रजापूर, हिरापूर, घारेगाव, पिंप्री, ब्रह्मगाव, ब्रह्मगव्हाण तांडा, गेवराई मर्दा, कडेठाण खुर्द-बुद्रुक, रांजणगाव आदी गावांत प्रचारादरम्यान ते बोलत होते. खासदार संदीपान भुमरे हे मंत्री व पालकमंत्री असताना शिक्षण, आरोग्य, रोजगार, कृषी क्षेत्रात शासनाच्या योजना राबवून पात्र लाभार्थींना लाभ मिळवून दिला.
त्यामुळे तुमचा सेवक म्हणून पैठणच्या सर्वांगीण विकासासाठी मला संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. (Shivsena) कार्यकर्त्यांमध्ये प्रत्येकाचा समन्वय असला तर येणाऱ्या काळात शेतकरी, कामगार, कष्टकरी, व्यापारी, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे.
याप्रसंगी भाजपचे सरचिटणीस तुषार शिसोदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव अप्पासाहेब निर्मळ, एकनाथ गवळ, शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर चौधरी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब तरमळे, शिवाजी भालसिंग, गोरख चव्हाण, बाजीराव राठोड यांच्यासह विविध गावांतील शिवसेना महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
सरपंच अखिल पटेल यांचा शिवसेनेत प्रवेश
रांजणगाव दांडगा येथील माजी सरपंच अखिल पटेल यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे जाहीर केले. या प्रवेशाबद्दल विलास भुमरे यांनी त्यांचे स्वागत केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.