विलासराव देशमुखांच्या तालमीत तयार झालोय : ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांची कबुली

विलासराव देशमुख आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची जुगलबंदी पाहणे आणि ऐकण्यासारखी असायची.
Girish Mahajan-Vilasrao Deshmukh
Girish Mahajan-Vilasrao DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

लातूर : माजी मुख्यमंत्री, लोकनेते विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांची भाषणे ऐकण्यासारखी असायची. त्यांच्याच तालमीत मी तयार झालो. विलासराव देशमुख आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांची जुगलबंदी पाहणे आणि ऐकण्यासारखी असायची. पण, सध्या होणारी टीकाटिप्पणी ऐकून कानावर बोट ठेवण्याची वेळ येत आहे, अशी खंत पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी व्यक्त केली. (Vilasrao Deshmukh and Gopinath Munde's speeches were worth listening to : Girish Mahajan)

लातूरचे पालकमंत्री झाल्यानंतर गिरीश महाजन यांनी जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक गुरुवारी (ता. ३ नोव्हेंबर) घेतली. या वेळी त्यांनी देशमुख, मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Girish Mahajan-Vilasrao Deshmukh
मंत्रालयाच्या गेटवर एन्ट्री करायला सांगताच आमदार बांगरांची पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ

ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, गेली ३० वर्ष मी आमदार आहे. पहिल्यांदा आमदार झालो, तेव्हा विलासराव सभागृहात नव्हते. पण, त्यांची भाषणे ऐकत होतो. नंतर ते मुख्यमंत्री झाले. त्यावेळी गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षनेते होते. सभागृहात पहिल्यांदा मुंडे बोलायचे. त्यावर विलासराव उत्तर द्यायचे. या दोघांची जुगलबंदी पाहण्यासारखी, ऐकण्यासारखी होती. आम्ही पोट धरून हसत राहायचो. आमच्यासाठी ती पर्वणीच असायची. दुर्दैवाने आज तसे खेळीमेळीचे वातावरण राहिले नाही. राजकारणाचा दर्जा घसरत चालला आहे. सध्या एकमेकांवर होत असलेली टीकाटिप्पणी पाहून वाईट वाटते. कानावर बोट ठेवण्याची वेळ येत आहे.

Girish Mahajan-Vilasrao Deshmukh
वडवळचा नागनाथ पावणार कोणाला...?महाडिकांना की परिचारक-पाटलांना....

फडणवीसांचे डावे-उजवे

जिल्हा नियोज समितीच्या आधीच्या बैठकी वादळी ठरायच्या. आजच्या बैठकीत मात्र वादळ उभे राहिले नाही. वादळ थोपवणारे पालकमंत्री तुम्ही आहात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उजवे हात आहात, असे आमदार अमित देशमुख हे महाजन यांना उद्देशून म्हणाले. आमदार संभाजी पाटील-निलंगेकरांनी आताचा कानात सांगतले की, तुम्ही फडवणीस यांचे डावे व उजवे असे दोन्ही हात आहात, असे असे देशमुख म्हणताच हशा पिकला. डावा उजवा जाऊ द्या, राजकारण बाजूला ठेवून दुजाभाव न करता काम केले जाईल, अशी ग्वाही महाजन यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com