मंत्रालयाच्या गेटवर एन्ट्री करायला सांगताच आमदार बांगरांची पोलिस कर्मचाऱ्यास शिवीगाळ

सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना रजिस्टरमध्ये नोंद करण्यास सांगितल्याने आमदार बांगरांचा पारा चढला
MLA Santosh Bangar
MLA Santosh BangarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदार संतोष बांगर (Mla Santosh Bangar) यांनी मुंबईत मंत्रालयात (ministry) प्रवेश करताना पोलिसांशी हुज्जत घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. सोबत असलेल्या कार्यकर्त्यांना रजिस्टरमध्ये नोंद करण्यास सांगितल्याने आमदार बांगरांचा पारा चढला आणि त्यांनी हुज्जत घालत शिवीगाळ केल्याचा आरोप संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने केला आहे. (MLA Santosh Bangar abused the policeman)

आमदार बांगर हे २७ ऑक्टोबर रोजी गार्डन गेटवरून मंत्रालयात जात होते. त्यावेळी त्यांच्यासोबत पंधराच्या आसपास कार्यकर्ते हेाते. त्यावेळी गेटवर उपस्थित असलेले पोलिस कर्मचारी यांनी त्यांना अडवले. त्यांना रजिस्टरमध्ये नोंदणी करण्यास सांगितले. त्यावेळी आमदार बांगर यांना राग अनावर झाला. त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांशी तू मला शिकवणार, असे म्हणून त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यानंतर बांगर यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप संबंधित पोलिस कर्मचाऱ्याने केला आहे.

MLA Santosh Bangar
एकतरी कारखाना पवारविरोधी हवा म्हणून ‘छत्रपती’त जाचक-घोलपांना साथ देणार : सतीश काकडेंची घोषणा

संबंधित पोलिस कॉन्स्टेबल यांनी आपल्या वरिष्ठांकडे याबाबतची तक्रार दिली आहे, त्यामुळे बांगरांनी पुन्हा एकदा वाद घातल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी माध्यान्ह भोजन योजनेच्या अंतर्गत डबे पुरविणाऱ्या गोदाम व्यवस्थापकाला आमदार बांगर यांनी मारहाण केली होती. तसेच, उपहारगृहाच्या व्यवस्थापकालाही शिवीगाळ करत मारले होते. त्यामुळे आमदार संतोष बांगर आणि वाद हे समीकरण बनले आहे.

MLA Santosh Bangar
वडवळचा नागनाथ पावणार कोणाला...?महाडिकांना की परिचारक-पाटलांना....

यासंदर्भात आमदार संतोष बांगर म्हणाले की, मी कुठल्याही पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातलेली नाही. मी मंत्रालयात जात असताना माझ्यासोबत कार्यकर्ते होते. त्यावेळी तेथील उपस्थित पोलिस कर्मचाऱ्याने आम्हाला एन्ट्री करण्यास सांगितले. त्यावेळी एका कार्यकर्त्याने ‘मी आमदार’ असल्याचे सांगितले. सुरुवातील त्याने मला ओळखले नाही. पण, ओळखल्यानंतर त्याने मला ‘जय महाराष्ट्र’ केला आणि त्यानंतर आम्ही सर्वजण मंत्रालयात गेलो. माझ्या ‘पीए’ने सर्वांची नोंद रजिस्टरमध्ये केली. मी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातली असेल तर त्या ठिकाणी सीसीटीव्ही आहेत, ते तुम्ही तपासू शकता, असे सांगून बांगर यांनी वाद झाला नसल्याचे स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com