Vinod Patil : भुमरेंची उमेदवारी जाहीर होताच शिंदे - फडणवीसांसमोर नवा पेच; विनोद पाटील लढण्यावर ठाम

Lok Sabha Election 2024 : छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमदेवारीबाबत सकारात्मक वातावरण होते. त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचीही सहमती होती, असा दावा पाटलांनी केला आहे.
Vinod Patil
Vinod PatilSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar : महायुतीत छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीचा तिढा सुटला आहे. ही जागा शिवसेना शिंदे गटाला दिली असून येथून मंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. असे असले तरी महायुतीपुढे नवा पेच निर्माण झाला आहे.

महायुतीकडून इच्छुक असलेले मराठा आरक्षण याचिकार्ते विनोद पाटील Vinod Patil यांनी निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मला उमेदवारी मिळणार होती, मात्र दोन आमदार आणि एका खासदाराने त्यावर गदा आणल्याचाही पाटलांनी आरोप केला आहे. यामुळे भुमरेंपुढील अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.

छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून माझ्या उमदेवारीबाबत सकारात्मक वातावरण होते. त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचीही सहमती होती. मात्र त्यांच्याच पक्षातील दोन आमदारांनी आणि एका राज्यसभेतील खासदाराने माझ्या नावाला तीव्र विरोध केल्याची माहिती आहे. त्यांनी असे का केले, हे मात्र समजत नाही, असेही पाटलांनी यावेळी सांगितले.

आधी विकासाठी निवडणूक लढवण्यासाठी माला आग्रह केला आता मात्र त्यांनी भूमिका का बदलली, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. मी मात्र निवडणूक लढवण्यावर ठाण आहे. त्यासाठी पुन्हा एकदा जनतेमध्ये जाणार आहे. सर्वांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेणार आहे, असे स्पष्ट करत येथील विजयाचे सूत्र माझ्या हातात असल्याचा विनोद पाटलांनी इशारा दिला आहे.

Vinod Patil
Jayant Patil News : महायुतीतील डझनभर नेते शरद पवार गटात येणार; जयंत पाटलांशी काय झाला करार?

छत्रपती संभाजीनगरची जागा महायुतीत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने राखली आहे. शिंदेंनी संदीपान भुमरेंना Sandipan Bhumre उमेदवारी जाहीर केली असून आता या मतदारसंघातून चौरंगी लढत होणार आहे. एमआयएमचे इम्तियाज जलील अपक्ष हर्षवर्धन जाधव हेही रिंगणात आहे. असे असले तरी भुमरेंची मुख्य लढत ही ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याशीच असल्याचे बोलले जाते. यात विनोद पाटलांनी रिंगणात उतरले तर ही लढत पंचरंगी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विनोद पाटील आता काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Vinod Patil
Dhairyasheel Mohite Patil : धैर्यशील मोहिते पाटलांना दिलासा, उमेदवारी अर्जाबाबत नेमकं काय झालं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com