Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना व भारतीय जनता पार्टी एकत्र लढल्यामुळे मतदारांनी मोठा कौल दिला होता. मात्र सत्तेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपची साथ सोडून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यासोबत घरोबा केला. त्यामुळे खरी गद्दारीची सुरुवात उद्धव ठाकरे यांच्यापासूनच झाली, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे यांनी केली.
गद्दारीची सुरुवात तुम्ही केली म्हणून `हम किसीको छेडते नही, और छेडा तो छोडेंगे नही, असा इशारा तावडे यांनी उद्धव ठाकरे व शरद पवार यांना नाव न घेता दिला. भाजपा महायुतीचे उमेदवार संभाजी पाटील निलंगेकर (Sambhaji Patil Nilangekar) यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी विनोद तावडे निलंगा येथे आले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आयोजित सभेत विनोद तावडे यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीक केली.
2047 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारताचे साक्षीदार आपल्या सर्वांना व्हायचे आहे. त्यासाठी महाराष्ट्रामध्ये महायुतीची सत्ता येणे गरजेचे असून अनेक महत्त्वकांक्षी योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये राबविण्यात येत आहेत. लोकसभा निवडणुकीत आघाडीला दोन कोटी सत्तर लाख मतदान झाले होते.
महाराष्ट्रामध्ये अडीच कोटी महिलांना `लाडकी बहीण` योजने मार्फत लाभ मिळाला असून महाराष्ट्रातील केवळ लाडक्या बहिणींनी ने आशिर्वाद दिले तर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा सुपडा साफ होईल आणि महायुतीची पुन्हा सत्ता येईल, असा दावा तावडे यांनी केला. (BJP) एक रुपयात पिक विमा, शेतकऱ्यांना मोफत वीज, अतिवृष्टी अनुदान `लाडकी बहीण योजना`, अशा अनेक योजना राबवल्या आहेत.
`लाडकी बहीण योजना` सुरू झाल्यानंतर सुप्रिया सुळे व शरद पवार यांच्या पोटात गोळा उठला, असा टोलाही विनोद तावडे यांनी आपल्या भाषणात लगावला. तर काँग्रेसच्या नेत्यांना गावात येऊ देऊ नका, असे आवाहन संभाजी पाटील निलंगेकर यांनी उपस्थितांना केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.