बदनापूर : भाजपचे आमदार नारायण कुचे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. नगरपंचायतीसाठी होणाऱ्या चार प्रभागातील निवडणुकीत भाजपलाच (Bjp) मतदान कर, नाहीतर गावात राहू देणार नाही, अशी थेट धमकीच कुचे (Mla Narayan Kuche) यांनी एका माजी सरपंचाला दिली आहे. (Jalna) आता या प्रकरणी बदनापूर पोलिस ठाण्यात माजी सरपंचाच्या तक्रारीवरून आमदार कुचे व अन्य काहीजणांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदनापूर नगरपंचायतीच्या चार प्रभागांसाठी येत्या १८ जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना मतदान करा व त्यांना निवडून आणा, नाहीतर तुम्हाला गावात राहू देणार नाही, तुम्हाला कुठलेही ठेवणार नाही, अशी धमकी नारायण कुचे यांनी दिली. तर त्यांच्या अंगरक्षकासह अन्य दोघे माजी सरंपचाच्या अंगावर दगड घेऊन धावून गेले.
एवढेच नाही तर कुचेंच्या अंगरक्षकाने `आमदार साहेब म्हणतात तसे करा नाही तर तुमची सोय पाहू`, असा इशाराही दिला. आता या प्रकारानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
दरम्यान, या तक्रारीच्या अनुषंगाने शनिवारी (ता. आठ) रात्री बदनापूर पोलिस ठाण्यात आमदार कुचेंसह अन्य तिघा जणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. हरिकीसन पुंजाजी होळकर (माजी सरपंच बदनापूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, बदनापूर येथील गणेशबाबा मंदिराच्या ओट्यावर रेल्वे पुलाजवळ आमदार नारायण कुचे यांनी त्यांना व त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीस बदनापूर नगरपंचायतीच्या १८ जानेवारी रोजी होणाऱ्या निवडणुकीत आमच्या उमेदवारांना मतदान करून निवडून आणा.
तुम्ही जर भाजपच्या उमेदवारांना मतदान केले नाही तर तुम्हाला बदनापुरात राहू देणार नाही. तुम्हाला कुठलेही ठेवणार नाही, असे म्हणत धमकावले. तर बाबासाहेब रघुनाथ कऱ्हाळे व गजानन भीमराव कऱ्हाळे हे दोघे संशयित त्यांच्या अंगावर दगड घेऊन धावले. कुचे यांच्या अंगरक्षकाने देखील साहेब सांगतात तसे करा अन्यथा तुमची सोय पाहून घेऊ, अशी धमकी दिली.
दरम्यान, या सगळ्या प्रकारावर कुचे यांनी मात्र आपल्यावरील आरोप फेटाळून लावत विरोधकांनी खोटी तक्रार दाखल केल्याचे म्हटले आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकीय सूडबुद्धीने आमच्यावर आरोप करण्यात आले आहेत, त्यात कुठलेही तथ्य नसल्याचे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.