Dharashiv News : धाराशिवमध्ये पाऊल टाकताच पालकमंत्री सरनाईकांची मोठी घोषणा; स्वागताला तानाजी सावंतांची दांडी

Guardian Minister Sarnaik Announcement News : धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात मोठे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे.
Pratap Sarnaik
Pratap Sarnaik Sarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात चार टर्म आमदार असलेल्या प्रताप सरनाईक यांची पहिल्यांदाच मंत्री म्हणून संधी मिळाली. त्यानंतर खातेवाटपात त्यांना परिवहन खाते देण्यात आले. त्यामुळे या खात्याला उर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे मोठे आव्हान असतानाच त्यांच्याकडे धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काळात मोठे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असणार आहे. त्यातच त्यांनी शनिवारी सायंकाळी धाराशिवमध्ये पाऊल टाकताच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केली. दरम्यान, यावेळी स्वागताला माजी मंत्री तानाजी सावंत यांनी दांडी मारल्याने चर्चा रंगली होती.

प्रजासत्ताक दिन रविवारी साजरा होत असून त्याच्या पूर्वसंध्येलाच पालकमंत्री सरनाईक (Pratap Saranaik) धाराशिवमध्ये आले आहेत. त्यांनी शनिवारी कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत घेत धाराशिव जिल्ह्यासाठी नवीन 50 लालपरी देण्याची घोषणा केली. त्यांनी पहिल्याच दौऱ्यात केलेल्या या मदतीच्या घोषणेतून धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या दृष्टीने आनंदाची बातमी दिली.

Pratap Sarnaik
Shivsena Politics : कट्टर विरोधक एकत्र, शिवसेनेची ताकद वाढली; राजेश पाटलांनी धनुष्यबाण घेतला हाती

त्यासोबतच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजना सुरूच राहणार आहेत. त्यात कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही. त्यासोबतच अन्य राज्यात एसटी कश्याप्रकारे चालते. याचा अभ्यास करून अन्य राज्यातील चांगली कामे आपल्या राज्यातही स्वीकारली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Pratap Sarnaik
Mahayuti Government : सत्तेत येऊन सरकारला महिना उलटला; सत्ताधारी कामाला लागेनात तर विरोधकांना सूर सापडेना ?

तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र विकसित करीत असताना भाविक, स्थानिक व्यापारी आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेऊनच विकासकामे केली जातील. धाराशिव शहरात बसस्थानाकाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. एप्रिल महिन्याच्या आत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर हे बसस्थानक प्रवाशी बांधवांसाठी सुरू होईल, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

Pratap Sarnaik
Ajit Pawar : 'एसटी'ची भाडेवाढ; अजितदादा म्हणतात, 'अद्याप अंतिम निर्णय झालाच नाही'

एसटीची भाडेवाढ झाली आहे. आता त्यापाठोपाठ चांगल्या सुधारणाही देण्याचा प्रयत्न असणार आहे. दरवर्षी एसटी महामंडळाच्या ताफ्यात नवीन पाच हजार बस दाखल होतात. पुढील पाच वर्षात एकूण 25 हजार नवीन बस गाड्या घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी नवीन 50 लालपरी बसगाड्या देत असल्याची घोषणा सरनाईक यांनी केली.

Pratap Sarnaik
Congress News : आघाडीच्या चर्चा सोडा; निवडणुका होण्याची गॅरंटी नाही; काँग्रेसच्या बड्या नेत्याने व्यक्त केली शंका

पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी यावेळी तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासमवेत आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, माजी खासदार प्रा. रवींद्र गायकवाड (Ravindra Gaikwad), जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे उपस्थित होते. दरम्यान, रविवारी सकाळी प्रजाकसत्ताक दिनाच्या निमित्ताने सरनाईक यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात येणार आहे.

Pratap Sarnaik
Mahayuti Government : सत्तेत येऊन सरकारला महिना उलटला; सत्ताधारी कामाला लागेनात तर विरोधकांना सूर सापडेना ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com