Walmik Karad Video : पोलिस व्हॅनमध्ये बसताना वाल्मिक कराडने आवाज दिलेला रोहित कोण?

Walmik Karad Shout for Rohit in Police Van : वाल्मिक कराड यांने पोलिस व्हॅनमध्ये बसताना रोहित कुठे आहे? असा प्रश्न विचारला. फक्त एकदाच नाही तर दोनदा तीनदा त्याने रोहित कुठे आहे? असे विचारले.
Walmik karad
Walmik karadsarkarnama
Published on
Updated on

Walmik Karad News :खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आला आहे. त्यामुळे त्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मिक कराड हे सुत्रधार असल्याचा आरोप देशमुख कुटुंबाकडून करण्यात येतो आहे.

वाल्मिक कराड याला मंगळवारी (ता.14) न्याायलयात हजर करण्यात आले होते. त्यानंतर तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले होते. तेथे त्यांची दोन तास तपासणी करण्यात आली. त्यानंतर कराडला रुग्णालयात बाहेर आणण्यात आले. त्यावेळी पोलिस व्हॅन भोवती त्याच्या समर्थकांचा गराडा होता. पोलिस व्हॅनमध्ये बसताना त्याने रोहित कुठे आहे? असा प्रश्न विचारला. फक्त एकदाच नाही तर दोनदा तीनदा त्याने रोहित कुठे आहे? असा प्रश्न केला.

पोलिसांनी देखील रोहितला आवाज दिला. कराड यांचे समर्थक देखील रोहितला पाठवा असे म्हणत होते. त्यामुळे रोहित कोण आहे याविषयी बीड जिल्ह्यात चर्चा सुरू आहेत

रोहित कोण आहे? या विषयी आमदार सुरेश धस यांनीच सांगितले आहे. ते म्हणाले, रोहित हा त्याच्या हाताखाली काम करणारा कर्मचारी आहे. रोहित कांबळे असं काही नाव आहे त्याचं. लागत असेल त्याची मदत काही. त्याला पोलिसांच्या गाडीत बसवून नेलं

Walmik karad
Supriya Sule : 'देशमुख, राऊत, मलिक यांना ईडी लावता, मग कराडला का नाही?', सुप्रिया सुळे यांचा सवाल

वाढलेली दाढी, पांढरा शर्ट

वाल्मिक कराड याला न्यायलयात हजर करण्यासाठी कोठडीतून बाहेर काढण्यात आले त्यावेळी त्याच्यामध्ये झालेला बदल दिसला. कराड याचे केस आणि दाढी वाढलेली होती. तर केस विस्कटलेले होते. अंगात पांढरा शर्ट होता.

इन कॅमेरा सुनावणी

कराडवर मकोका लावल्याने आज (बुधवारी) त्यांची इन कॅमेरा सुनावणी झाली. एसआयटीकडून कराडच्या दहा दिवसांच्या कोठडी मागणी केली आहे. बीडच्या कोर्टात सुनावणी सुरू होती. यामध्ये पोलिसांनी संतोष देशमुखची हत्या करणाऱ्या आरोपींनी वाल्मिक कराड याच्यासोबत फोनवरून संभाषण केल्याचे सांगितले. हत्येच्या दिवशी दुपारी 2.30 ते 3.30 दरम्यान हत्या करणाऱ्या आरोपींसोबत कराड याने संभाषण केल्याचे कोर्टात सांगण्यात आले.

Walmik karad
Manoj Jarange Patil : 'मनोज जरांगेंच्या मुसक्या आवळा, कायद्याचा पट्टा घाला', ओबीसी नेता संतापला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com