Shivsena Mla Ambadas Danve News Aurangabad
Shivsena Mla Ambadas Danve News AurangabadSarkarnama

शिवसेना संपवायला निघालेल्या भाजपला सोडले तर पक्षप्रमुखांचे काय चुकले? दानवेंचा सवाल..

भाजपच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना काय अधिकार होते हे शिंदे, रामदास भाई यांना माहित आहे. (Mla Ambadas Danve)
Published on

औरंगाबाद : शरद पवार, अजित पवार यांनी डाव साधला, त्यांच्यामुळे शिवसेना फुटली असा आरोप करत माजी शिवसेना नेते रामदास कदम यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना यासाठी दोषी धरले. यावर आता शिवसेनेकडून प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते अंबादास दानवे यांनी ` जो भाजप पक्ष शिवसेना संपवायला निघाला होता, ज्यांनी २५ वर्ष असलेली युती २०१४ मध्ये तोडली, त्या भाजपला सोडून जर नवा मित्र शोधला तर पक्षप्रमुखांचे काय चुकले ? असा सवाल करत दानवेंनी कदमांचे आरोप फेटाळले.

रामदास कदम यांची (Shivsena) शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी आज प्रसार माध्यमांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या व्यक्त करत असतांना ते ढसाढसा रडले देखील. त्यांच्या या संपुर्ण निवेदनात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह तर उपस्थितीत केलेच. (Marathwada) पण राष्ट्रवादीमुळे शिवसेना संपत असल्याचा आरोपही केली. या सगळ्या आरोपांवर शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

आमदार अंबादास दानवे म्हणाले, एखादा नेता किंवा आमदार, खासदार पक्ष सोडून जातो तेव्हा त्याला काहीतरी कारणे द्यावी लागतात. रामदास कदम यांनी राष्ट्रवादीवर केलेले आरोप हे त्यापैकीच एक आहे. रामदास कदम हे शिवसेनेतील ज्येष्ठ, लढवय्ये नेते होते, ५० वर्ष त्यांनी शिवसेनेत घालवली आहेत, त्यामुळे पक्ष सोडतांना त्यांच्या भावना अनावर होणे समजू शकतो. पण जे गेले ते राष्ट्रवादीमुळे गेले हे म्हणणे चुकीचे आहे.

भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरणारे आमदार किंवा खासदार हे कसे विसरले की याच राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन भाजपने विश्वासदर्शक ठराव मंजूर करुन घेतला होता. अजित पवार यांच्यासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता. तर राजकारणात अशा गोष्टी घडत असतात. एकनाथ शिंदे जे आज भाजपसोबत जाण्याचा आग्रह धरत आहेत, त्यांनी ते मंत्री असतांना भाजपबद्दल काय भाषणे केली होती, आरोप केले होते हे एकदा तपासा.

Shivsena Mla Ambadas Danve News Aurangabad
ज्या वटवृक्षाखाली वाढलो, त्याच्यावर घाव घालण्याची माझी प्रवृत्ती नाही ; मी ठाकरेंसोबतच..

भाजपच्या सरकारमध्ये शिवसेनेच्या मंत्र्यांना काय अधिकार होते हे शिंदे, रामदास भाई यांना माहित आहे. मग जो पक्ष शिवसेना संपवायला निघाला होता, ज्याने २०१४ मध्ये पंचवीस वर्षाची युती तोडली होती, त्याला सोडून जर दुसरा मित्र शोधला तर त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे काय चुकले? राहिला प्रश्न राष्ट्रवादीने त्यांच्या माजी आमदारांना निधी दिला या आरोपाचे तर निधीमुळे कधी कोणतीही संघटना मोठी होत नसते, शिवसेना ही संघर्ष, कडवट हिंदुत्व आणि मराठी अस्मितेतून पुढे आलेली संघटना आहे.

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे फारसे अस्तित्व नसलेल्या या शहरातील आमदारांनी देखील आम्हाला निधी मिळाला नाही असे आरोप केले याचे आश्चर्य वाटते. प्लास्टीक बंदीचा निर्णय पर्यावरण मंत्री म्हणून मी घेतला पण श्रेय आदित्य ठाकरेंना दिले गेले, यावर देखील दानवेंनी भूमिका स्पष्ट केली. एखाद्या निर्णयाच्या अपयशाचे खापर जसे नेतृत्वावर फोडले जाते, तसेच एखाद्या निर्णयाचे श्रेय देखील त्या नेत्याला दिले पाहिजे. आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतूनच प्लास्टीक बंदीचा निर्णय घेण्यात आला होता, असेही दानवे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com