Raosaheb Danve News : अशाही नणंद-भावजय; रावसाहेब दानवेंची लेक अन् सून यांचा एकत्रित प्रचार...

Lok Sabha Election 2024 : एकीकडे राज्याच्या मोठ्या घराण्यात पडलेली वादाची ठिणगी, तर दुसरीकडे समन्वय आणि नातेसंबंध जपत दानवे यांची लेक आणि सून म्हणजेच नणंद-भावजय प्रचारात व्यस्त असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
Raosaheb Danve News
Raosaheb Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : राजकारणामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण होऊन कौटुंबिक संबंध बिघडतात. लोकसभा निवडणुकीच्या बारामती मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यातील लढत हे त्याचे ताजे उदाहरण असल्याचे बोलले जाते. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात विशेषतः नणंद-भावजय यांची चर्चा अधिक होताना दिसते. इकडे मराठवाड्यातील जालना लोकसभा मतदारसंघात मात्र लेक आणि सून म्हणजेच नणंद-भावजय एकत्रित प्रचार करतांना दिसत आहेत. (Latest Marathi News)

रावसाहेब दानवे यांची कन्या आशा पांडे आणि सून रेणू दानवे या नणंद-भावजय एकत्र प्रचार करून मतदारांना आवाहन करतांना दिसत आहेत. लोकसभेच्या निवडणुकीकडे लोकशाहीचा उत्सव म्हणून बघितले जाते. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, यासाठी प्रशासन आणि राजकीय पक्षही प्रयत्न करत असतात. उमेदवाराचे तर अख्खे कुटुंब हात जोडून मतदारांना आवाहन करण्यात व्यस्त असते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raosaheb Danve News
Shinde Will Join BJP? : सुशीलकुमार शिंदे भाजपत जाणार?; नाना पटोलेंनी दिले हे उत्तर...

राज्य पातळीवर अनेक मोठ्या नेत्यांच्या प्रचारात त्यांचे कुटुंब उतरल्याचे दिसून येते. जालना लोकसभा मतदारसंघातून सहाव्यांदा निवडणूक लढवत असलेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रचारात त्यांची लेक आणि सून दोघीही उतरल्या आहेत. दानवे यांच्या कन्या आशा पांडे या जिल्हा परिषदेच्या सदस्य आणि सरपंच आहेत.

वडील रावसाहेब दानवे आणि भाऊ आमदार संतोष दानवे यांच्या पावलावर पाऊल टाकत आशा पांडे राजकारणात सक्रीय आहेत. पण संतोष दानवे यांच्या पत्नी आणि रावसाहेब दानवे यांच्या सूनबाई रेणू दानवे या पहिल्यांदाच निवडणूक प्रचारात सक्रीय झाल्याचे दिसून आले. दानवे यांच्या प्रचाराच्या दोन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. भाजपचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते प्रचारात सक्रीय असतांना रावसाहेब दानवे यांचे कुटुंब तरी मागे कसे राहील.

Raosaheb Danve News
Lok Sabha Election 2024 : दानवे खैरेंकडे पाहत म्हणाले, 'साहेबांनी माझं पद काढण्याचा खूप प्रयत्न केला पण...'

त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य प्रचारााठी गावोगावी, घराघरात फिरतांना दिसत आहेत. मुलगा आमदार संतोष दानवे, पत्नी निर्मला दानवे, चुलत बंधू व जालना कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती भास्कर दानवे यांच्यासह दानवे यांच्याच्या मूळ गावातील सर्व नातेवाईक सर्कलनुसार प्रचार करत आहेत. राज्याच्या राजकारणात बारामती (Baramati) मतदारसंघात तर नणंद भावजय एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. तर इकडे नणंद आशा पांडे आणि भावजय रेणू दानवे मात्र एकत्र प्रचार करत आहेत.

एकीकडे राज्याच्या मोठ्या घराण्यात पडलेली वादाची ठिणगी, तर दुसरीकडे समन्वय आणि नातेसंबंध जपत दानवे यांची लेक आणि सून म्हणजेच नणंद-भावजय प्रचारात व्यस्त असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. आमदार संतोष दानवे यांच्या पत्नी रेणू दानवे या राजकारणापासून पूर्णपणे अलिप्त आहेत. यंदा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मात्र त्या पहिल्यांदाच प्रचारात उतरल्या आहेत. भोकरदन शहरातील विविध भागात त्यांनी कन्या युवराज्ञी हिला सोबत घेत मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या.

Raosaheb Danve News
Ajit Pawar NCP : बारामतीत 'घड्याळा'च्या प्रचारासाठी आणलं अन् उन्हातान्हात उपाशी ठेवलं

सासू निर्मला दानवे, नणंद आशा पांडे आणि सून रेणू या तिघांची जोडी मतदारसंघात चर्चेचा विषय ठरत आहे. आशा पांडे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. सरपंच पदापासून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली. या माध्यमातून मतदारसंघात त्यांचा जनसंपर्क आहे. निर्मला दानवे या रावसाहेब दानवेंच्या (Raosaheb Danve) अनुपस्थितीत नातेवाईक व कार्यकर्त्यांच्या सर्व कार्यक्रमांना हजेरी लावतात. त्या पाठोपाठ आता रेणू दानवे आगामी काळात राजकारणात सक्रिय होतात का? याची चर्चा त्यांच्या प्रचारातील सक्रीयेमुळे सुरू झाली आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com