Ambadas Danve : महाराष्ट्रातून उद्योग पळवले जात होते, तेव्हा शेणमार करणारे कुठे होते ?

Ambadas Danve's question to MNS : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कायम सांगत की त्यांच्या वडिलांच्या घरावर शेणमार झाली होती. मेलेले गाढव घरापुढे टाकले गेले होते, त्यांच्या अंत्ययात्रा काढल्या गेल्या होत्या, ते ही जिवंतपणी. सांगायचे कारण असे की, हे ठाकरेंना नवीन नाही.
Ambadas Danve | Raj Thackeray
Ambadas Danve | Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Shivsena UBT Political News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मराठवाडा दौऱ्यात बीडमध्ये त्यांच्या गाडीवर सुपारी फेक करण्यात आली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी ही सुपारी फेक केल्याचे बोलले जाते. तर संजय राऊत यांनी ते आमचे कार्यकर्ते नव्हते असे स्पष्ट केले. त्यानंतर ठाण्यात भगवा सप्ताहाच्या मेळाव्याला आलेल्या उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेण, बांगड्या, टमाटे फेकत संताप व्यक्त केला.

राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी छत्रपती संभाजीनगरात `माझ्या नादाला लागू नका, माझी पोरं काय करतील सांगता येत नाही`, असा इशारा दिल्यानंतर त्याचे पडसाद लगेच उमटले. या शेणमाऱ्यानंतर ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रबोधनकार ठाकरेंच्या काळात झालेली शेणफेक, घरामोर गाढव आणून केलेले आंदोलन याचा दाखला देत राज ठाकरे यांच्या मनसे व त्यांच्या पोरांवर खरमरीत टीका केली.

महाराष्ट्रातील उद्योग परराज्यात पळवले जात होते, तेव्हा रागाच्या भरात एखाद्या मंत्र्याच्या गाडीवर शेणफेक कल्याचे आठवत नाही. तेव्हा कुठे गेला होतात? अशा शब्दात टीका केली. या संदर्भात ट्वीट करत अंबादास दानवे यांनी राज ठाकरे आणि त्यांच्या मनसैनिकांवर निशाणा साधला. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे कायम सांगत की त्यांच्या वडिलांच्या घरावर शेणमार झाली होती.

Ambadas Danve | Raj Thackeray
Video Shivsena UBT Vs MNS : ठाण्यातील राड्याचे कोल्हापुरात पडसाद; मनसेच्या शाखा फलकांची तोडफोड

मेलेले गाढव घरापुढे टाकले गेले होते, त्यांच्या अंत्ययात्रा काढल्या गेल्या होत्या, ते ही जिवंतपणी. सांगायचे कारण असे की, हे ठाकरेंना नवीन नाही. (Ambadas Danve) या घटनांनंतर लोकांना ठाकरेच लक्षात राहीले. शेण फेकणारे नाही!

ही शेणमार महाराष्ट्रातून उद्योग पळवले जात असताना रागाच्या भरात कोणा मंत्र्याच्या गाडीवर गत तीन वर्षात कधीच झाली नाही. एक गोष्ट मात्र नक्की.. ही बाब तुमचं आगामी निवडणुकांचे धोरण अधोरेखित करते ! असे म्हणत अंबादास दानवे यांनी मनसेचा हा निवडणूक कार्यक्रम असल्याचा टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com