Marathwada : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून भाजपने आज राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणूक प्रमुखांची यादी जाहीर केली.(Bjp Appoint Loksbha Constituency Head) ती जाहीर करतांना काही जिल्ह्यात नव्या चेहऱ्यांना तर काही ठिकाणी जुनं ते सोनं धोरण स्वीकारत जबादाऱ्या सोपवल्या आहेत.
(Bjp)भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यंतरी (Marathwada) मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यांचा दौरा केला होता. या दौऱ्यातून जी नावं त्यांनी निवडली होती, त्यावरच शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जाते. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात भाजपने समीर राजूकर सारख्या तरुण पदाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी सोपवली आहे.
त्याच प्रमाणे जालना लोकसभा मतदारसंघात देखील छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीणचे माजी जिल्हाध्यक्ष आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांचे विश्वासू विजय औताडे यांची नेमणूक केली आहे. धाराशीव लोकसभा मतदारसंघात नितीन काळे यांची नियुक्ती करत पक्षाने आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर अधिक विश्वास दाखवल्याचे दिसून आले आहे.
परभणीत भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांचे वडील रामप्रसाद बोर्डीकर यांना लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. बोर्डीकर हे गेल्या अनेक वर्षापासून राजकारणात सक्रीय आहेत, शिवाय त्यांचा जिल्ह्यात दांडगा संपर्क आहे. याचा फायदा लोकसभा निवडणुकीत भाजपला होवू शकतो.
हिंगोलीत भाजपचे ज्येष्ठ नेते रामराव वडकुते यांच्यावरच विश्वास दर्शवण्यात आला. बीड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख पदी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के यांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात भाजपमध्ये अतर्गंत गटबाजी असली तरी म्हस्के यांचे संबंध सगळ्यांशीच चांगले असल्यामुळे पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे.
लातूर लोकसभा या राखीव मतदारसंघात भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे विश्वासू दिलीप देशमुख यांना तर नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष व्यंकट गोजेगावकर यांची निवडणूक प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.
विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे विश्वासू म्हणून गोजेगांवकर ओळखले जातात. भाजपने लोकसभा निवडणूक प्रमुख जाहीर केल्यानंतर आता कोणत्या मतदारसंघातून भाजप आणि शिंदे गट लढणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. लोकसभेच्या दृष्टीने भाजपची तयारी जोरदार सुरू असून शिंदे गटात मात्र शांतात दिसत आहे.
हे आहेत भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख
छत्रपती संभाजीनगर : समीर राजूरकर
जालना : विजय औताडे
परभणी : रामप्रमसाद बोर्डीकर
नांदेड : व्यकंट गोजेगावकर
हिंगोली : रामराव वडकुते
लातूर : दिलीप देशमुख
धाराशीव : नितीन काळे
बीड : राजेंद्र म्हस्के
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.