Chhatrapati Sambhajinagar : भाजपाच्या राज्यातील मंडळ अध्यक्षांची निवड झाल्यानंतर आता शहर आणि जिल्हाध्यक्ष पदासाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. बंद लिफाफ्यात नावे मागितल्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत कमालीची गुप्तता पाळत संघटनात्मक निवडीमध्ये पक्षाने धक्कातंत्राचा अवलंब सुरू केल्याचे दिसते. छत्रपती संभाजीनगरच्या शहराध्यक्ष पदासाठी चार नावाची जोरात चर्चा सुरू आहे. आता बंद लिफाफ्यात असलेल्या विद्यमान शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांची पुन्हा वर्णी लागते? की मग नवा चेहरा पक्ष देतो, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पक्षाचा शहर-जिल्हाध्यक्ष कसा असावा? याबद्दलची अपेक्षा भाजपाचे (BJP) प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी नुकत्याच झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात व्यक्त केल्या होत्या. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा, पक्षाला वेळ देणारा तो असावा, असे चव्हाण यांनी म्हटले होते. नेत्यांच्या मागे पुढे फिरला नाही तरी चालेले, असा टोला चव्हाण यांनी तेव्हा लगावला होता. आता तो नेमका कोणाला होता? हे इच्छुकांनी तपासले पाहिजे. परंतु बंद लिफाफ्यामध्ये पाठवण्यात आलेल्या शिरीष बोराळकर, जालिंदर शेंडगे, समीर राजूरकर, दिलीप थोरात यांची नावे असल्याची माहिती आहे. आता ज्या नावाला सर्वाधिक पंसती मिळेत तोच शहराध्यक्ष होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गुडबुकमध्ये असलेल्या शिरीश बोराळकर यांना पुन्हा संधी दिली जाईल, अशी चर्चा भाजपाच्या गोटात आहे. तर यावेळी पक्ष भाकरी बदलणार आणि नव्या चेहऱ्याला संधी देणार, असेही बोलले जाते. येत्या काही दिवसात भाजपा शहराध्यक्षाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. नवीन शहराध्यक्ष निवडणूक प्रक्रियेसाठी रामराव केंद्रे यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. शहराध्यक्ष पदासाठी 21 कॅटेगिरीतील पदाधिकाऱ्यांनी प्रत्येकी तीन नावे सुचवली आहेत. येथे एससी एक, खुला प्रवर्ग तसेच एक महिला कार्यकर्ते अशा तिघांच्या नावाची शिफारस करण्यात आली.
भाजप कार्यालयात मंगळवारी उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. यानंतर बुधवारी ही बंद लिफाफ्यातील नावे शिफारसपत्रांसह निवडणुक निरीक्षकांमार्फत प्रदेश कार्यालयात पाठवण्यात आली आहेत. आमदार, खासदार, राष्ट्रीय तसेच प्रदेशावरील प्रमुख पदाधिकारी, शहराध्यक्ष, शहर सरचिटणीस, महिला मोर्चा, युवा मोर्चासह अन्य मोर्चाचे अध्यक्ष, माजी महापौर अशा 23 जणांच्या कोअर कमिटीच्या सदस्यां पैकी 20 जणांनी आपली शिफारस पत्र सादर केली आहेत.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजयाताई रहाटकर, मराठवाडा संघटन मंत्री सचिन तोडगे व माजी आमदार श्रीकांत जोशी हे मात्र या प्रक्रियेपासून दूर होते. केंद्र राज्यात सत्तेत असलेल्या भाजपच्या शहराध्यक्ष पदासाठी चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळत आहे यासाठी काहींनी मुंबई वारीही केली परंतु यात स्थानिक कोर कमिटी कडून होणारी शिफारस महत्त्वाची राहणार आहे त्यामुळे आपल्याच नावाची शिफारस व्हावी यासाठी इच्छुकांनी चांगलेच प्रयत्न केले आहेत यामुळे शहराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहेत मे च्या पहिल्या आठवड्यात नवीन शहराध्यक्षाची घोषणा होण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.