Beed BJP : बीड भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; सुरेश धसांच्या मतदारसंघातील नियुक्त्या रखडल्या

Beed BJP internal conflict News : धस यांच्या मतदारसंघातील निवडी या अंतर्गत वादामुळे रखडल्या आहेत. या निवडीला आता कधी मुहूर्त लागणार याची उत्सुकता लागली आहे. बीड जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या निवडीवर मंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व आहे.
Suresh Dhas, Pankaja Munde
Suresh Dhas, Pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News : बीड जिल्ह्यात भाजपमध्ये मंत्री पंकजा मुंडे व सुरेश धस यांच्यात सुप्त संघर्ष आहे. त्याचा परिणाम भाजपमधील संघटनात्मक निवडीवर झाला आहे. बीड जिल्ह्यातील आमदार धस यांचा आष्टी-पाटोदा मतदारसंघ वगळता अन्य ठिकाणच्या मंडळाध्यक्ष निवडीचे काम पूर्ण झाले आहे. धस यांच्या मतदारसंघातील निवडी या अंतर्गत वादामुळे रखडल्या आहेत. या निवडीला आता कधी मुहूर्त लागणार याची उत्सुकता लागली आहे. बीड जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या निवडीवर मंत्री पंकजा मुंडे यांचे वर्चस्व आहे.

पंकजा मुंडे (Pankja Munde) या दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या असून बीड जिल्ह्यातील भाजपमध्ये त्यांचा खोलवर प्रभाव आहे. दुसरीकडे, सुरेश धस हेही बीडचे मातब्बर नेते असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करून स्वतःचा स्वतंत्र गट उभा केला आहे. गेल्या काही दिवसापासून दोघेही आपापल्या कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील भाजप नेतृत्वावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपमधील गटबाजी दिसून येत आहे.

Suresh Dhas, Pankaja Munde
BJP Politics : भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष निवड प्रक्रिया म्हणजे दोन सख्खा चुलत भावांसह चंद्रकांत पाटलांसाठी परीक्षा

गेल्या काही दिवसापासून बीड जिल्हयातील प्रत्येक घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीमधील नेतेमंडळींत अंतर्गत धुसफूस पहावयास मिळत आहे. तर दुसरीकडे भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नाही. पंकजा मुंडे व सुरेश धस यांच्यात फारसे काही सख्य नाही. विधानसभा निवडणुकीनंतर सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली होती. त्यानंतर दोघांमधील मतभेद समोर आले आहेत.

Suresh Dhas, Pankaja Munde
Bharat Gogawale-Aditi Tatkare: गोगावलेंना कुणी गंडवले? तटकरे-अमित शाह भेट सार्थकी लागली का?

बीड जिल्ह्यात भाजपमधील मंत्री पंकजा मुंडे आणि माजी मंत्री सुरेश धस यांच्यातील सुप्त संघर्ष गेल्या काही काळात अनेक वेळा दिसून आला. हा संघर्ष स्थानिक पातळीवर प्रभाव वाढवण्याचा आणि नेतृत्वावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न आहे, असे राजकीय निरीक्षक मानतात. या संघर्षाचा प्रभाव भाजपच्या संघटनात्मक निवडीत जाणवत आहे. त्यामुळे काही ठिकाणी निवड प्रक्रियेत विलंब होत आहे.

Suresh Dhas, Pankaja Munde
Devendra Fadnavis Announcement : महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे मोठं गिफ्ट, आता मंत्रालयात चकरा मारण्याची आवश्यकता नाही...

गेल्या चार महिन्यात दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दोन्हीवेळी पंकजा मुंडे व सुरेश धसही दोघेही कार्यक्रमास हजर होते. मात्र, दोघामधील विसंवाद स्पष्टपणे जाणवत होता. त्याशिवाय गेल्या काही दिवसापासून सर्वत्र संघटनात्मक निवडीचे काम सुरू झाले आहे. मात्र, बीड जिल्ह्यातील अन्य ठिकाणच्या मंडळाध्यक्ष निवडीचे काम पूर्ण झाले असले तरी आमदार धस यांच्या आष्टी-पाटोदा मतदारसंघातील निवडी या अंतर्गत वादामुळे रखडल्या आहेत.

Suresh Dhas, Pankaja Munde
Devendra Fadnavis : राज्याच्या पोलीस प्रशासनावर फडणवीसांचाच दबदबा; रश्मी शुक्ला अन् देवेन भारतींसाठी केला मोठा आटापिटा!

येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील संघर्ष हा भाजपसाठी स्थानिक पातळीवर धोक्याची घंटा आहे. जर हे मतभेद सोडवले गेले नाहीत, तर बीडमधील पारंपरिक भाजप मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होऊन पक्षाच्या मतांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे येत्या काळात भाजपमधील वरिष्ठ पातळीवरील नेत्याना या अंतर्गत वादात लक्ष घालावे लागणार आहे.

Suresh Dhas, Pankaja Munde
Devendra Fadnavis : राज्याच्या पोलीस प्रशासनावर फडणवीसांचाच दबदबा; रश्मी शुक्ला अन् देवेन भारतींसाठी केला मोठा आटापिटा!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com