Ashok Chavan On Assembly Speaker : अशोक चव्हाणांना का आठवला सनी देओलच्या चित्रपटाचा डायलाॅग...

Congress News : अशोक चव्हाण यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारला टोला लगावला आहे.
Ashok Chavan On Assembly Speaker News
Ashok Chavan On Assembly Speaker NewsSarkarnama
Published on
Updated on

Maharashtar Political News : राजकारणी आणि चित्रपट अभिनेत्यांमध्ये अनेकदा मैत्री पाहायला मिळते. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात अनेक चित्रपट अभिनेते, अभिनेत्रींनी आपली दुसरी इनिंग राजकारणातून सुरू केल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. (Sunny Deol News) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांना सध्या सनी देओल यांच्या दामिनी चित्रपटातील एका डायलाॅगची आठवण झाली आहे. त्यामागचे कारणही तसेच विशेष आहे, ते म्हणजे राज्यातील अपात्र आमदारांवरील कारवाईसंदर्भात विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडून दिली जाणारी वारंवार तारीख.

Ashok Chavan On Assembly Speaker News
Shinde Government News : शिंदे सरकारवर न्यायालयाचे ताशेरे; ठाकरे सरकारच्या प्रकल्पांना स्थगिती देणे घटनाबाह्य

यावरून अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर निशाणा साधला आहे. "तारीख पे तारीख मिलती है... लेकिन इन्साफ नहीं मिलता माय लॉर्ड, इन्साफ नहीं मिलता! मिली है तो सिर्फ ये तारीख", या दामिनी चित्रपटातील सुपरहिट डायलॉगमधून अभिनेते व आज भाजपचेच खासदार असलेले सनी देओल यांनी आपला उद्वेग व्यक्त केला होता. (Congress) तशीच काहीशी वेळ आज महाराष्ट्राच्या नागरिकांवर ओढवली आहे.

बंडखोर आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी, मराठा समाजाचे आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, धनगर समाजाचे आरक्षण, अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना अलीकडेच एकच उत्तर मिळतंय. (Marathwada) ते म्हणजे "तारीख पे तारीख", अशा शब्दांत अशोक चव्हाण यांनी विधानसभेचे अध्यक्ष आणि राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारला टोला लगावला आहे. महाराष्ट्रात सध्या आरक्षण आणि आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईची सुनावणी हे मुद्दे गाजताहेत.

वर्षभरापूर्वी शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी भाजपला साथ देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आमदार अपात्रतेच्या मागणीवरून संघर्ष सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही या विषयावर विधानसभेचे अध्यक्ष सुनावणी आणि निर्णय घेत नाहीत.

या संदर्भात विरोधकांनी नार्वेकर यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोपही केला. आता १३ आॅक्टोबर रोजी या संदर्भात पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांनी आपल्या फेसबुकवरील पोस्टमधून सरकार आणि विधानसभा अध्यक्षांवर टीका केली आहे. यासाठी सनी देओलच्या चित्रपटातील ` तारीख पे तारीख`चा आधार त्यांनी खुबीने केल्याची चर्चा होत आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com