Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSarkarnama

Shinde Government News : शिंदे सरकारवर न्यायालयाचे ताशेरे; ठाकरे सरकारच्या प्रकल्पांना स्थगिती देणे घटनाबाह्य

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : आघाडी सरकारने घेतलेले निर्णय मुख्यमंत्री शिंदेंनी तोंडी आदेश देत स्थगित केले होते.
Published on

Mumbai : मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारनं घेतलेले निर्णय रद्द केले आहेत, तर काही निर्णयांना स्थगिती दिली आहे. याबाबतच्या याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. यावर न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Ashish Shelar News : बावनकुळेंचा पदाधिकाऱ्यांना सल्ला, सुळेंच्या कानपिचक्या, शेलारांचे कवितेतूनच उत्तर; ताईंचं पंचांग “हेरंब” लिहितात...

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेले प्रकल्प व विकासकामे यांना स्थगिती देण्याचा एकनाथ शिंदे सरकारचा आदेश घटनाबाह्य असल्याचे गंभीर निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी नोंदवले आहे. आघाडी सरकारने घेतलेले निर्णय मुख्यमंत्री शिंदेंनी तोंडी आदेश देत स्थगित केले होते. याबाबत अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

उच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या खंडपीठांच्या आदेशांतील निरीक्षणेही मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय व न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने नोंदवली आहेत. खंडपीठाने निरीक्षण नोंदवताना म्हटलं आहे की, मुळात घटनेच्या अनुच्छेद १६६ अन्वये शासकीय कामकाजाचे नियम लक्षात घेता, मुख्य सचिवांचे आदेश घटनेशी विसंगत आहेत. असेच जर होत राहिले, तर सरकारी कारभाराचे काय होणार?

"मुख्यमंत्र्यांच्या तोंडी आदेशाच्या आधारे सचिवांनी काढलेला आदेश राज्यघटनेतील तत्त्वांना धरून नसल्याचा निष्कर्ष यापूर्वीच उच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या खंडपीठांनी नोंदवला आहे. त्यामुळे मुख्य सचिवांचे अशाच धर्तीवर जुलै-२०२२मध्ये एकापेक्षा अधिक आदेश असतील, तर ते रद्दच करावे लागतील," असे न्यायालयाने म्हटलं आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Bacchu Kadu News: बच्चू कडूंच्या निशाण्यावर शिंदे-फडणवीस; 'मी सत्तेत जरी असलो तरीही सरकारची ही चूक...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com