Cabinet Expansion : अखेर ठरलं ; शिंदे गटातील दोघे केंद्रीय मंत्रिमंडळात ; शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदींकडून खास भेट

Maharashtra Politics : कुणाचा मंत्री करायचे, यांचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपविण्यात आल्याचे समजते.
Union Cabinet Expansion news update
Union Cabinet Expansion news updatesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आज (शुक्रवारी) वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारला मोदी सरकारनं खास भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या वाट्याला एक कॅबिनेट एक राज्यमंत्री पद मिळणार असल्याची माहिती आहे.

कुणाचा मंत्री करायचे, यांचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपविण्यात आल्याचे समजते. अमेरिका दौऱ्यावरुन परत आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना बैठकांचा सपाटा लावला आहे. गुरुवारी रात्री मोदींची भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली. या बैठकीसाठी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी रात्री दिल्लीला रवाना झाले होते.

Union Cabinet Expansion news update
Ayushman Bharat Yojana: पुणे तिथं 'उणेच'; मोदींच्या महत्वाकांक्षी योजनेला वाटाण्याच्या अक्षता

मोदींनी पुढील आठवड्यात मंत्रिपरिषदेची बैठक बोलवली आहे. यात केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलाबाबत चर्चा होणार आहे. त्यानंतर केंद्रीय पातळीवर भाजपच्या संघटनात्मक बदल होणार असल्याची शक्यता आहे. राज्याच्या सत्तासंघर्षात शिंदेंनी दाखवलेल्या निष्ठेचं फळ दोन मंत्रीपदाच्या माध्यमातून दिले जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पंढरपूर येथील विठ्ठलाच्या महापूजेनंतर गुरुवारी रात्री मुख्यमंत्री शिंदेंनी फडणवीसांसह दिल्ली गाठली. त्यांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्मुला ठरला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेच्या दोघांना स्थान मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदे गटातील कुणाला स्थान मिळेल, हे लवकरच समजेल.

Union Cabinet Expansion news update
Ramdas Athawale News: शिंदे-फडणवीसांकडे 'रिपाइं' केली ही मागणी; आगामी निवडणुकीत योग्य वाटा..

ज्या राज्यात आगामी विधानसभांच्या निवडणुका आहेत तेथील भाजपच्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे समजते.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com