Thackeray Group Morcha: आदित्य ठाकरेंच्या मोर्च्याला भाजप देणार सडेतोड उत्तर...

Aditya Thackeray Politics: ठाकरे गटाच्या वतीने आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेवर येत्या 1 जुलैला भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
Aditya Thackeray
Aditya ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Thackeray Group Morcha: ठाकरे गटाच्या वतीने आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात  मुंबई महानगरपालिकेवर येत्या 1 जुलैला भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी ठाकरे गटाने परवानगी मागितल्यानंतर कायदा सुव्यस्थेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण मोर्चाचा मार्ग बदलल्यानंतर मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली आहे.

पण ठाकरेंच्या मोर्च्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपकडून प्रतिमोर्चा काढण्यात येणार आहे. 'चोर मचाए शोर' अशी घोषणाबाजी ठाकरे गटाच्या वतीने करण्यात येणार आहे. रिपब्लिकन पार्टी ऑप इंडियाही या मोर्च्यात सहभागी होणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वात मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान  असा ठाकरे गटाचा मोर्चा काढण्यात येणार आहे. तर त्याला उत्तर देण्यासाठी शनिवारी दुपारी चार वाजता भाजपच्या पक्ष कार्यालयापासून नरीमन पॉईंट असा मोर्चा भाजपच्या वतीने काढण्यात येणार आहे.

Aditya Thackeray
Cabinet Expansion : अखेर ठरलं ; शिंदे गटातील दोघे केंद्रीय मंत्रिमंडळात ; शिंदे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मोदींकडून खास भेट

भाजपच्या युवा मोर्चाकडून ठाकरेंच्या युवा मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे. गेले २५ वर्षे मुंबई महापालिकेवर शिवसेनेचं सरकार होतं. या काळात त्यांनी हजारो कोटींचे घोटाळे केले. कोरोना महामारी काळात मुंबई महापालिकेने केलेले भ्रष्टाचार. कोविड डेड बॉडी भ्रष्टाचार, जंबो कोविड सेंटर घोटाळा, अशा अनेक मुद्द्यावरुन भाजपने पुन्हा ठाकरे गटाला घेरण्याची तयारी केली आहे. यामुळे उद्या आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या विरुद्ध भाजप युवा मोर्चा असे चित्र दिसणार आहे. मुंबई महापालिकेत झालेल्या घोटाळ्या प्रकरणी राज्य सरकारने जी एसआयटी नेमली. त्यावरुन ठाकरे गटाला मिरची का झोंबली, असा खोचक सवालही भाजपकडून विचारण्यात येत आहे.

दरम्यान, गेल्या दिड वर्षांपासून महानगरपालिकेवर प्रशासक राज आल्यापासून रस्त्याच्या कामात आणि खडीच्या कामात मोठे घोटाळे झाल्याचा आरोप ठाकरे गटाने करण्यात आला आहे. याविरोधात ठाकरे गटाने मोर्चाची हाक दिली आहे. खास बाब म्हणजे ठाकरे गटाने या मोर्चाचा एक टीझरही शेअर केला. पण कायदा सुव्यस्थेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोर्चाला परवानगी नाकारली. पण ठाकरे गट मात्र मोर्चासाठी ठाम होता. त्यानंतर ठाकरे गटाने मोर्च्याचा मार्गात बदल केल्यानंतर त्यांना मोर्च्याची परवानगी देण्यात आली. पण त्यांच्या या मोर्चाला उत्तर देण्यासाठी भाजपनेही तयारी केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com