Raosaheb Danve : मोठी बातमी! भाजप रावसाहेब दानवेंना राज्यसभेवर पाठवणार?

Raosaheb Danve On Rajya Sabha : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांना भाजप राज्यसभेवर पाठवणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
Raosaheb Danve News
Raosaheb Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News, 17 August : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री तथा लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे माजी खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना भाजप राज्यसभेवर पाठवणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला होता. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील महायुती सरकार विरोधात असलेल्या वातावरणाचा फटका दानवे यांना बसला आणि काँग्रेस महाविकास आघाडीचे कल्याण काळे या मतदारसंघातून विजयी झाले.

त्यानंतर पराभव विसरत रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी मतदारसंघासह मराठवाडा आणि राज्यात पक्ष संघटनेच्या कामाला सुरुवात केली होती. आपल्याला विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा नको. जनतेने मला नाकारले आहे, त्यामुळे पक्षाकडे काहीही मागणार नाही, अशी स्पष्ट भूमिका घेत आपण संघटनेचे काम करणार यावर दानवे अद्यापही ठाम आहेत.

नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या वेळी रावसाहेब दानवे यांना उमेदवारीसाठी विचारणा झाली होती. मात्र त्यास दानवे यांनी नम्रपणे नकार कळवला होता. त्यानंतर राज्यसभेच्या महाराष्ट्रातील दोन जागांसाठी येत्या 3 सप्टेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला.

Raosaheb Danve News
Anil Deshmukh : "आमचं ठरलंय! राज्याचा मुख्यमंत्री शरद पवार, उद्धव ठाकरे अन्..."; अनिल देशमुख नेमकं काय म्हणाले?

रावसाहेब दानवे यांच्यासारखा प्रदीर्घ अनुभव असलेला आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेला नेता दिल्लीत हवा असा एक मत प्रवाह पक्षात आहे. शिवाय महाराष्ट्रातील मराठा नेतृत्व म्हणून दानवे यांचे राजकीय पुनर्वसन होणे आवश्यक असल्याचे मत अनेकांचे आहे. या पार्श्वभूमीवर 3 सप्टेंबर रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या दोन जागांसाठी भाजपने (BJP) उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. यात दानवे यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे.

Raosaheb Danve News
Girish Mahajan Politics : नाशिकच्या दंगलीत खासगी पिस्तुलाचा वापर? चर्चेला फुटले तोंड...

यासंदर्भात रावसाहेब दानवे यांच्याशी सरकारनामा प्रतिनिधीने यापूर्वी संपर्क साधला असता त्यांनी आपली कोणतेही पद किंवा राज्यसभा, विधान परिषदेवर जाण्याची इच्छा नसल्याचे सांगितले. परंतु पक्षाने काही निर्णय घेतला तर तो मला ऐकावंच लागेल, असे सांगत आमच्या पार्लमेंटरी कोअर कमिटीची बैठक झाल्याशिवाय उमेदवारी कोणाला मिळाली हे स्पष्ट होत नसते. अद्याप ती बैठक झालेली नाही त्यामुळे राज्यसभेवर मला संधी मिळणार, या चर्चांना काही अर्थ नाही,असे रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट सांगितले होते.

मात्र त्यानंतर आता पुन्हा त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून राज्यसभा निवडणुकीसाठी कागदपत्रांची जमवाजमव करण्यास त्यांना सांगण्यात आल्याचे समजते. एकूणच महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता रावसाहेब दानवे यांचचे राजकीय पुनर्वसन करून भाजप मराठा समाजाचा रोष कमी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जाते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com