MLA Pradnya Satav News : आमदार प्रज्ञा सातव यांना काँग्रेस पुन्हा संधी देणार का ?

Congress Politics : आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस त्यांना कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. याशिवाय सातव यांना विधान परिषदेचा पूर्ण काळ मिळाला नसल्याने...
MLA Pradnya Satav News
MLA Pradnya Satav NewsSarkarnama
Published on
Updated on

Hingoli News : काँग्रेसकडून विधान परिषदेवर संधी मिळालेल्या प्रज्ञा सातव यांचा कार्यकाळ गुरुवारी (ता.27) संपत आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेचे सदस्य शरद रणपिसे यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड करण्यात आली होती.

काँग्रेसचे दिवगंत नेते राजीव सातव (Rajiv Satav) यांच्या अचानक झालेल्या निधनानंतर सातव कुटुंब खचले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी व त्यांच्या कुटुंबाशी राजीव सातव यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राष्ट्रीय युवक काँग्रेसची मोठी जबाबदारी राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्यावर सोपवली होती.

या शिवाय राज्यसभेवर निवड, गुजरात विधानसभा निवडणुकीची जबाबदारी, राष्ट्रीय कार्यकारणीत स्थान देत राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्यावर मोठा विश्वास दाखवला होता. सातव यांनी आपल्या कामातून तो सार्थ ठरवला. राजकारणातील आणखी मोठी ध्येय, उद्दिष्ट घेऊन वाटचाल करत असताना अचानक कोरोनासारख्या आजाराने राजीव सातव यांना ग्रासले आणि यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

सातव कुटुंबासाठी जसा हा मोठा धक्का होता तसा तो काँग्रेस आणि गांधी कुटुंबासाठी होता. सातव यांच्या अचानक झालेल्या निधाननंतर गांधी कुटुंबाने सातव कुटुंबाची संपुर्ण काळजी तर घेतलीच पण राहुल गांधी यांनी सातव यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही देत दिलेला शब्द खरा करून दाखवला होता.

MLA Pradnya Satav News
Uddhav Thackeray : पुणे ड्रग्ज प्रकरणावरून ठाकरेंनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारची काढली लक्तरे !

राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेवर प्रज्ञा सातव यांना संधी दिली जाईल, अशी तेव्हा चर्चा होती. परंतु राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेत प्रज्ञा सातव यांना संधी दिली. काँग्रेसचे शरद रणपिसे यांचे आकस्मिक निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर प्रज्ञा सातव यांची नोव्हेंबर 2021 मध्ये बिनविरोध निवड झाली होती.

रणपिसे यांचा आधीचा कार्यकाळ लक्षात घेता सातव यांची मुदत संपत आल्यामुळे त्या गुरुवारी निवृत्त होत आहेत. राज्यातील सरकारचे या कार्यकाळातील हे शेवटचे विधीमंडळ पावसाळी अधिवेशन आहे. प्रज्ञा सातव यांच्यासह मराठवाड्यातील पाथरीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार बाबाजानी दुर्राणी हे देखील आज निवृत्त होत आहेत.

प्रज्ञा सातव (Pradnya Satav) यांची विधानपरिषदेवर निवड झाल्यानंतर हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दिवंगत राजीव सातव यांचे अपुर्ण राहिलेले काम आपल्याला पूर्ण करायचे आहे, असा निर्धार त्यांनी विधान परिषदेवर निवड झाल्यानंतर व्यक्त केला होता.

जिल्ह्यातील अवैध धंदे, महिलांवरील अत्याचार या शिवाय शैक्षणिक, सामाजिक विषयावर सभागृहात प्रज्ञा सातव यांनी प्रभावीपणे आपली भूमिका मांडली. विधान परिषदेच्या सदस्य म्हणून सातव आज निवृत्त होत असल्या तरी काँग्रेसकडून त्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

MLA Pradnya Satav News
Uddhav Thackeray on MLC Election : ठाकरेंचं गणित पक्कं; विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे आमदार फोडणार?

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस त्यांना कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्याची शक्यता आहे. याशिवाय सातव यांना विधान परिषदेचा पूर्ण काळ मिळाला नसल्याने काँग्रेस त्यांना पुन्हा याच सभागृहात बसण्याची संधी देण्याची शक्यताही नाकारता येत नाही, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

MLA Pradnya Satav News
Video Devendra Fadnavis Meet Uddhav Thackeray : देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवर उद्धव ठाकरे म्हणाले, 'ना ना करते...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com