औरंगाबाद : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) व त्यांचे जुने सहकारी काॅंग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष डाॅ. कल्याण काळे यांनी आमदार हरिभाऊ बागडे यांचा गेम केला होता. गेली कित्येक वर्ष जिल्हा बॅंकेत संचालक असलेल्या बागडेंचा (Haribhau Bagde) या जोडगळीने पराभव घडवून आणत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.
आता जिल्हा दूध संघाची निवडणूक जाहीर झाली असून उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. जिल्हा दूध संघाचे अध्यक्षपद सांभाळतांनाच बागडे यांनी संघावर आपले वर्चस्व कायम राखले होते. आता या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा बागडे यांची परीक्षा आहे. सत्तेसह स्वतःकडे अध्यक्षपद राखण्यात ते यशस्वी होतात, की मग सत्तार-काळे जोडी त्यांना दूध संघातूनही हद्दपार करणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
जिल्हा दुध संघासाच्या निवडणुकीसाठीठी आजपासून नामनिर्देशनपत्र विक्री, स्विकृतीची प्रक्रिया सुरू झाली. संचालक मंडळाच्या १४ जांगासाठी २२ जानेवारीला मतदान होणार आहे. जिल्हा दुध संघ ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीने देखील जोर लावला आहे. तर जिल्हा बॅंकेत झाला तसा दगाफटका पुन्हा होऊ नये याची काळजी घेत भाजपचे नेते ताकही फुंकून पितांना दिसत आहेत.
जिल्हा सहकारी दुध संघाची निवडणुक प्रक्रिया सोमवारपासून (ता.२०) सुरु होत आहे. दुध संघाच्या १४ जागासाठी २२ जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान, तर २३ जानेवारीला निकाल जाहीर होईल. जिल्हा मध्यवर्ती बँकेनंतर जिल्हा सहकारी दुध संघ ताब्यात घेण्यासाठी सरकार मधील तीन्ही पक्ष व भाजपतर्फे जोरदार तयारी सुरू आहे. पॅनल आणि उमेदवारांची नावेही पक्षातर्फे ठरविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
कोरोनामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसह सहकारी क्षेत्रातील निवडणूकाही लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था (समिती निवडणूक) व सचिव राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण यांनी निवडणूक कार्यक्रमास मान्यता दिली आहे. त्यानुसार निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून तुळशीराम बी.भोजने यांची नियुक्ती केला आहे.
जिल्हा दुध संघाच्या सामान्य सभासदांनी तालुकावार निवडलेले प्रतिनिधी (म्हणजेच प्रत्येक तालुक्यातून एक) असे -९ प्रतिनिधी, अनूसूत जाती-जमातील -१, महिला राखीव-२, इतर मागसवर्गीय-१, विजा/भज/ विमाप्र-१ अशा १४ जागासाठी निवडणूक होणार आहे. गेल्या वेळी दुधसंघाची निवडणूक बिनविरोध पार पडली होती. जिल्ह्यातील ३४६ सभासद १४ संचालकांनाची निवड करणार आहेत.
२४ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशपत्र स्विकारले जाणार आहे. २७ डिसेंबर रोजी नामनिर्देशनपत्राच्या छाननी होईल. २८ डिसेंबरला याची सुची प्रसिध्दी केली जाणार आहे. २८ डिसेंबर ते ११ जानेवारी पर्यंत नामनिर्देशपत्र मागे घेता येणार आहे. १२ जानेवारील उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. २२ जानेवारील मतदान व २३ रोजी मतमोजणी होईल. सहाकार क्षेत्रातील जिल्हा बँकेनंतर दुध संघाची निवडणुकीही प्रतिष्ठेची मानली जाते.
यामुळे विद्यामान संघाचलक मंडळ पुन्हा दुध संघात येण्यासाठी जोरदार तयारी करीत आहे. यासह गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही निवडणूक बिनविरोध करता येईल, का याचीही चाचपणी करण्यात आली. मात्र त्यास यश न आल्याने निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. भाजपतर्फे पुन्हा आमदार हरिभाऊ बागडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पॅनल मैदानात उतरणार आहे.
दुसरीकडे माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यातर्फे दुधसंघ ताब्यात घेण्यासाठीच्या हालचाली सुरू आहेत. राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आणि शिवसेनेकडूनही दुध संघ ताब्यात घेण्यासाठी पॅनल उतरविण्यात येणार आहे. आता निवडणूकीत महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष पॅनल देणार की, स्वतंत्रपणे लढणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.