Parbhani District Assembly Election 2024 : लोकसभेला पिछाडीवर असलेली महायुती विधानसभेला कमबॅक करु शकेल का ?

Will the Mahayuti, which is trailing in the Lok Sabha, make a comeback in Parbhani? : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झाले तेव्हा परभणी जिल्हा उद्धव ठाकरे याच्याशी एकनिष्ठ राहिला. तत्कालीन खासदार संजय जाधव, परभणीचे आमदार राहुल पाटील हे पक्षासोबत राहिले. त्यामुळे या जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची पाटी कोरीच राहिली.
Parbhani District Assembly Election 2024
Parbhani District Assembly Election 2024sarkarnama
Published on
Updated on

Parbhani District Mahayuti-Mahavikas Aghadi News : मराठवाड्यातील परभणी जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीने एक प्रयोग केला. मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाचा फायदा उचलण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना परभणीतून लोकसभेची उमेदवारी दिली. महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जानकर यांच्यासाठी ही जागा सोडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रणनिती आणि ओबीसी मतदारांची निर्णायक संख्या असूनही जानकरांचे पार्सल परभणीकरांनी माघारी धाडले.

ओबीसी मतांवर डोळा ठेवून केलेली खेळी महायुतीच्या अंगलट आली आणि याचा थेट फायदा महाविकास आघाडीतील शिवसेनेचे संजय जाधव यांना झाला. (Parbhani) सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत जाधव यांनी आपले पाय मतदारसंघात घट्ट रोवले. आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा परभणी जिल्ह्यात महायुतीची परीक्षा असणार आहे. लोकसभा निवडणुकीत माघार घेतलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एखादी अतिरिक्त जागा पदरात पडते का? यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

तर शिवसेना शिंदे गट परभणीसह जिल्ह्यातील अन्य एखाद्या मतदारसंघावर दावा सांगण्याची शक्यता आहे. भाजपकडे जिल्ह्यातील जिंतूर आणि परतूर हे दोन विधानसभा मतदारसंघ आहेत. याठिकाणी अनुक्रमे मेघना बोर्डीकर, बबनराव लोणीकर हे विद्यमान आमदार आहेत. गंगाखेड मतदारसंघात रासपचे रत्नाकर गुट्टे, तर पाथरीची जागा काँग्रेसचे सुरेश वरपुडकर यांच्याकडे आहे. परभणी शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार राहुल पाटील यांच्या रुपाने वर्चस्व कायम आहे.

Parbhani District Assembly Election 2024
Parbhani Assembly Election: विधानसभेला परभणी जिल्ह्यावर कोण वर्चस्व गाजवणार?

लोकसभा निवडणुकीतील विजयाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आत्मविश्वास वाढला आहे, तर महाविकास आघाडीसाठी हा विजय बुस्टर डोस देणारा ठरणार आहे. (Mahavikas Aghadi) जागा वाटपात काही मतदारसंघात अदलाबदल महायुती-महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांकडून होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी शिवसेनेचे संजय जाधव यांनी लोकभेला रासपचे महादेव जानकर यांचा दारुण पराभव केला होता. विधानसभेच्या सर्वच मतदारसंघात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले होते.

1 लाख 34 हजारांची लीड घेत महाविकास आघाडीला मिळालेला विजय विधासभेच्या सहा पैकी किती जागा महाविकास आघाडीला मिळवून देणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. परभणी जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर जिंतूर, परतूरची जागा भाजप, परभणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पाथरी काँग्रेस तर गंगाखेडची जागा राष्ट्रीय समाज पक्षाच्या वाट्याला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झाले तेव्हा परभणी जिल्हा उद्धव ठाकरे याच्याशी एकनिष्ठ राहिला.

Parbhani District Assembly Election 2024
Mahayuti News : मतदारसंघ एकच दावा तीन पक्षांचा; महायुतीत धाराशिव-कळंब कोणाला मिळणार?

तत्कालीन खासदार संजय जाधव, परभणीचे आमदार राहुल पाटील हे पक्षासोबत राहिले. त्यामुळे या जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची पाटी कोरीच राहिली. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिंदे गटाला जिल्ह्यात एखादी जागा जिंकता येते का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. अजित पवार यांचे परभणी जिल्ह्यावर वर्चस्व असले तरी पक्ष फुटीनंतर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आव्हान दिले जात आहे.

विधानसभा निवडणुका जवळ येतील तसे शरद पवारांचे जिल्ह्यात दौर वाढतील. तेव्हा आपले नेते, पदाधिकारी सांभाळण्याचे मोठे आव्हान अजित पवार यांच्यासमोर असणार आहे. विधानसभा लढवण्यास इच्छुक असणाऱ्यांची वाढती संख्या पाहता येत्या काही दिवसात महाविकास आघाडी-महायुती या दोन्ही बाजूने पक्षांतर मोठ्या प्रमाणात होऊ शकते. एकूणच लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विधानसभेला महायुतीची आणखी एक परीक्षा असणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com